महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 03:10 PM2019-06-12T15:10:48+5:302019-06-12T15:11:04+5:30

वाशिम : महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृतीचे अनेक अर्ज प्रलंबित असून, सदर अर्ज निकाली काढण्यासाठी आता ३० जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

scholarship application is pending on Maha-DBT portal! | महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित !

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित !

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृतीचे अनेक अर्ज प्रलंबित असून, सदर अर्ज निकाली काढण्यासाठी आता ३० जून २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली.
राज्य शासनामार्फत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल १ आॅक्टोंबर २०१८ पासून नव्याने सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक यांनी तयार केलेल्या संकेतस्थळावरून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजना आॅनलाईन करण्यात आल्या आहेत. महाडीबीटी पोर्टलवर २१ मार्च २०१९ पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आणि महाविद्यालयांना अर्जांवर कार्यवाही करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. आता ही मुदत ३० जून २०१९ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
वाढीव मुदतीत शासनाच्या संकेतस्थळावरील विजाभज, इमाव, विमाप्र तसेच अनुसूचित जाती प्रवगार्तील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालय स्तरावरील आॅनलाईन झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित पात्र अर्ज तत्काळ विनाविलंब निकाली काढता येतील. ही अंतिम मुदतवाढ असून ३० जून २०१९ नंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य, मुख्याध्यापक यांची राहील, असा इशारा समाजकल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी दिला.
 
महाबीडी पोर्टलवरील शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी ३० जून ही अंतीम मुदतवाढ आहे. यानंतर मुदवाढ नसल्याने अर्ज निकाली काढावेत. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापकांवर राहील.
- माया केदार
सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण
वाशिम

Web Title: scholarship application is pending on Maha-DBT portal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.