वाशिम जिल्ह्यात ८५०० विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्तीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 03:04 PM2020-02-16T15:04:32+5:302020-02-16T15:04:43+5:30
एकूण नऊ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ८५०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील ८५०० विद्यार्थ्यांनी १६ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्तीचीपरीक्षा दिली.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीपरीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व इयत्ता पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर)परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा १६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. एकूण नऊ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी ८५०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. वाशिम तालुक्यात पाचवीचे परीक्षा केंद्र ९ होते. या केंद्रावर १६०८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यापैकी १५४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. आठवणीचे केंद्र सहा असून १०६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एसएमसी या केंद्राला शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश सरनाईक यांनी भेट दिली. यावेळी केंद्र संचालक अभिजीत मुकुंदराव जोशी व कर्मचारी उपस्थित होते.