शिष्यवृत्तीची परीक्षा आता २३ मे रोजी; विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:43 AM2021-04-01T04:43:03+5:302021-04-01T04:43:03+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविल्यानुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २५ एप्रिल रोजी होणार होती; मात्र शालेय ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविल्यानुसार पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या २५ एप्रिल रोजी होणार होती; मात्र शालेय शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्रानंतर राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. २५ एप्रिलदरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा येत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. अभ्यासाकरिता आता आणखी काही दिवस मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेची प्रपत्र आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी यापूर्वी ३० मार्चपर्यंतची मुदत होती. ती आता १० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.
............
शिष्यवृत्ती परीक्षा
२३ मे
ऑनलाईन अर्ज भरता येणार
१० एप्रिलपर्यंत
...............
असा करावा अर्ज
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाईटवर करावा. वेळापत्रक, माहिती पुस्तिका आणि अर्ज याठिकाणी उपलब्ध आहे.
......................
बॉक्स :
दहावी, बारावी परीक्षा व कोरोनाचे कारण
दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच शिष्यवृत्तीची परीक्षा घेतली जाते. यंदा मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली. आधी फेब्रुवारीऐवजी २५ एप्रिल आणि आता २३ मे हा परीक्षेसाठी मुहुर्त काढण्यात आला आहे.
२५ एप्रिल रोजी नियोजित शिष्यवृत्ती परीक्षेकरिता बहुतांश विद्यार्थ्यांचे अर्जच सादर झाले नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने २३ मे रोजी होणारी परीक्षाही आॅनलाईन की आॅफलाईन, असा प्रश्न पालकांसमोर उपस्थित झाला आहे.