शिष्यवृत्ती प्रलंबित; खर्च भागविणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:38 AM2021-02-14T04:38:38+5:302021-02-14T04:38:38+5:30
........... रिक्त पदांमुळे कामकाज प्रभावित वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तुलनेने मनुष्यबळ अत्यल्प आहे. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांची १४ ...
...........
रिक्त पदांमुळे कामकाज प्रभावित
वाशिम : उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तुलनेने मनुष्यबळ अत्यल्प आहे. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांची १४ पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ ५ भरण्यात आली आहेत. यामुळे कामकाज प्रभावित होत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.
............
आधार लिंक खात्याची माहिती सादर करा!
मालेगाव : मग्रारोहयोअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम केलेल्या मजुरांच्या आधार लिंक बँक खात्याची माहिती विनाविलंब सादर करावी, असे आवाहन पंचायत समितीकडून करण्यात आले आहे. मंजुरी न मिळालेल्या मजुरांची यादी पं.स. व तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.
..............
मधुमक्षिका पालनाकडे वळण्याचे आवाहन
किन्हीराजा : मधुपक्षिका पालन व्यवसायातून दारिद्रयरेषेखालील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश बाळगण्यात आला आहे. त्यामुळे मधुमक्षिका पालनाकडे वळावे, असे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी येथे केले.
..................
सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले
मेडशी : परिसरात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत सेंद्रीय शेतीचे प्रमाण वाढले आहे. सेंद्रीय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाला विक्रीसाठी कृषी विभागाने व्यवस्था निर्माण केल्याने शेतकºयांचा फायदा होत आहे.
..................
२४ तास सेवेचा निर्णय तकलादू
वाशिम : पशुवैद्यकीय सेवेकरिता जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखाने आकस्मिक प्रसंगी २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला; मात्र एकाही दवाखान्यात सेवा मिळत नसल्याने निर्णय तकलादू ठरल्याचा सूर पशुपालकांतून उमटत आहे.
.................
रोहयो घोटाळ्याचा तपास संथ गतीने
जऊळका रेल्वे : मारसूळ येथील रोहयो घोटाळ्याप्रकरणी ३१ डिसेंबर रोजी १४ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. असे असले तरी या प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू असून कामेही ठप्प झाली आहेत.
..............
जिल्ह्यात बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित
ेवाशिम : जिल्ह्यात १९९८-९९ पासून २०२० पर्यंत एकूण २१२० बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित झाले. तसेच यावर्षी ठराविक उद्दीष्टानुसार २६ बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी विकास बंडगर यांनी दिली.
...............
अमानी केंद्राकडून वाहनधारकांचे प्रबोधन
वाशिम : येथून मालेगावकडे जाणाºया मार्गावर असलेल्या अमानी महामार्ग पोलिस केंद्राकडून ३२ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत १३ फेब्रूवारी रोजी वाहनधारकांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी अनेक वाहनांना ‘रिफ्लेक्टर’ही लावण्यात आले.
...............
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास जलाभिषेक
वाशिम : ‘३६५ दिवस शिवजलाभिषेक सोहळा’ या उपक्रमांतर्गत येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास शनिवारी जलाभिषेक करण्यात आला. यावेळी महेश धोंगडे, योगेश लोनसुने आदिंची उपस्थिती होती.
............
पोलिसांनी वाढविली रात्रीची गस्त
वाशिम : रात्रीच्या सुमारास होणाºया चोºया, घरफोड्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाशिम पोलिसांनी काही भागात रात्रगस्त वाढविली आहे. नागरिकांनीही कुठेही संशयास्पद प्रकार आढळून आल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
.............
अतीक्रमण हटविण्याची मागणी
वाशिम : येथील आंबेडकर चौकापासून श्री शिवाजी विद्यालयापर्यंत रस्त्याच्या कडेला असलेला पादचारी मार्ग अतीक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. लघूव्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून अतीक्रमण हटवावे, अशी मागणी प्रमोद मुळे यांनी शनिवारी केली.
...............
पॅसेंजर रेल्वे बंदच; प्रवाशांची गैरसोय
वाशिम : येथून हिंगोली नांदेड व अकोला याठिकाणी जाव्या लागणाºया नागरिकांना पॅसेंजर रेल्वेचा पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडणारा होता; मात्र लॉकडाऊनपासून बंद असलेली रेल्वे अद्याप सुरू झाली नसून प्रवाशांची यामुळे गैरसोय होत आहे.