आधार संलग्नित बँक खात्याअभावी शिष्यवृत्ती रखडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 04:06 PM2021-01-30T16:06:32+5:302021-01-30T16:06:37+5:30

Washim News विद्यार्थ्यांची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या रक्कमा प्रलंबित आहेत.

Scholarship stalled due to lack of Aadhaar attached bank account! | आधार संलग्नित बँक खात्याअभावी शिष्यवृत्ती रखडली !

आधार संलग्नित बँक खात्याअभावी शिष्यवृत्ती रखडली !

Next

वाशिम : आधार क्रमांकाशी बँक खाते क्रमांक लिंक नसल्याने जिल्ह्यातील काही अनु. जाती, विजाभज, इमाव आणि विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेच्या रक्कमा प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी शनिवारी केल्या.
जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी शासनाच्या पडताळणी या संकेतस्थळावर प्राचार्य लॉगीन अथवा क्लार्क लॉगीनमधून ‘रिपोर्ट्स’ विभागातून ‘स्टुडंट्स डिसबर्समेंट रिपोर्ट’ व ‘इन्स्टिट्यूट डिसबर्समेंट रिपोर्ट’ लिंकमधून विभागाच्या योजना व वर्षनिहाय प्रवर्गानुुसार विद्यार्थ्यांची यादी डाऊनलोड करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या नावासमोर रिमार्क रकान्यामध्ये असलेल्या त्रुटीची तपासणी करावी तसेच लाभार्थ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक करण्याची कार्यवाही पूर्ण करावी. विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती योजनेची रक्कम जमा करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, याची खात्री करूनच पूर्तता अहवाल सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण वाशिम या कार्यालयास सादर करण्याच्या सूचनाही सहायक आयुक्त केदार यांनी प्राचार्यांना दिल्या. भविष्यात विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करूनच विद्यार्थ्यांचा अर्ज सादर करावा. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक संदर्भात काही समस्या निर्माण झाल्यास याची जबाबदारी प्राचार्यांवर राहील तसेच लाभार्थी या योजनाच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची जबाबदारी संबंधित महाविद्यालय व प्राचार्य यांची राहील, असा इशाराही केदार यांनी दिला.

Web Title: Scholarship stalled due to lack of Aadhaar attached bank account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.