पंचायत समिती कारंजांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:46+5:302021-06-29T04:27:46+5:30

कोविड १९ या महामारीमुळे यंदाचे शैक्षणिक सत्रही ऑनलाइनच सुरू झाले आहे. या पृष्ठभूमीवर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष गृहभेट देऊन, ...

School Admission Ceremony for Divyang Students under Panchayat Samiti Fountain | पंचायत समिती कारंजांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सव

पंचायत समिती कारंजांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सव

Next

कोविड १९ या महामारीमुळे यंदाचे शैक्षणिक सत्रही ऑनलाइनच सुरू झाले आहे. या पृष्ठभूमीवर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष गृहभेट देऊन, तसेच पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वागत गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत मिळत असलेल्या सोईसुविधा बद्दल पालकांना मार्गदर्शन करून सविस्तर माहिती देण्यात आली. संबंधित शाळेतील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद तथा केंद्र प्रमुख गोंदेवार, केंद्र समन्वयक सचिन उत्तमराव घुले, विशेष शिक्षक, अतुल प्रमोद गणवीर, तालुका समन्वयक यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आनंद वाढविण्यासाठी परिश्रम घेतले.

-----------------------

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून मार्गदर्शन

शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, कारंजात सोमवार २८ जून रोजी शिक्षकांसाठी शाळा उघडण्यात आल्या असून, ऑनलाइन शिक्षणसत्राला सुरुवात करण्यात आली. या सत्रावरही कोरोना संसर्गाचा प्रभाव असल्याने शाळा भरण्याची शक्यता सध्या तरी कमीच आहे. यामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्याचा हिरमोड होऊ नये, दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा, या उद्देशाने गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून गृहभेटी देत, पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

Web Title: School Admission Ceremony for Divyang Students under Panchayat Samiti Fountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.