स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:32 PM2020-12-13T12:32:14+5:302020-12-13T12:35:36+5:30

School Bus News शाळा बंदमुळे स्कूलबसचा व्यवसाय अद्यापही सुरू होऊ शकला नाही.

school bus drivers has no source of income | स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ

स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ

Next
ठळक मुद्देर्सरी ते आठवीचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे स्कूल बसची चाकेही जागेवरच आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: यंदा कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला; परंतु अनलाॅकच्या टप्प्यात अन्य उद्योगधंदे पूर्ववत होत असताना, शाळा बंदमुळे स्कूलबसचा व्यवसाय अद्यापही सुरू होऊ शकला नाही. परिणामी, चालक व मालकांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला असून, वाहन उभे असतानाही विविध प्रकारचा कर भरण्याची वेळ आली आहे.
यंदा मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लाॅकडाऊन आहे. जून महिन्यापासून अनलाॅकचे टप्पे सुरू झाले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बहुतांश उद्योग, धंदे सुरू झाले आहेत. दुसरीकडे नर्सरी ते आठवीचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. त्यामुळे स्कूल बसची चाकेही जागेवरच आहेत. याचा सर्वाधिक फटका चालकांना बसला आहे. कोरोनामुळे खासगी वाहनांवरदेखील चालकाचा रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा कसा? असा पेच चालकांसमोर निर्माण झाला आहे. स्कूल बसमधून खासगी प्रवासी वाहतूकदेखील करता येत नसल्याने स्कूलबसच्या मालकांसमोरही आर्थिक प्रश्न निर्माण झाला. 

उपजिविकेसाठी पर्यायी व्यवसाय
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन आहे. अनलाॅकच्या टप्प्यात अनेक उद्योगधंदे पूर्ववत झाले. शाळा सुरू नसल्यामुळे स्कूल बसेस बंद असल्याने स्कूल बस चालक व मालकांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला. काहींनी पर्यायी व्यवसाय सुरू केला तर काही जणांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. काही चालकांनी अन्य वाहनावर चालक म्हणून रोजगार शोधला आहे. काही स्कूल व्हॅन, आॅटोवाल्यांनी शहरात खासगी प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र, यामध्ये फारसे यश नाही.


कोरोना विषाणू संसर्गाचा फटका सर्वच उद्योगधंद्यांना बसला आहे. अनलॉकच्या टप्प्यात बहुतांश उद्योग, धंदे पूर्ववत झाले. परंतु शाळा सुरू झाल्या नसल्यामुळे स्कूल बस जागेवरच उभ्या आहेत. यामुळे आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. पर्यायी रोजगारदेखील उपलब्ध नाही. स्कूलबस जागेवरच उभ्या असल्याने शासनाने वाहनाचा विविध प्रकारच्या कर माफ करणे अपेक्षित आहे.
- आशिष देशमुख
स्कूल बस मालक वाशिम

Web Title: school bus drivers has no source of income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.