महिनाभराच्या आतच पुन्हा शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:17 AM2021-02-21T05:17:32+5:302021-02-21T05:17:32+5:30
वाशिम : वाढता काेराेना संसर्ग पाहता २७ जानेवारीपासून सुरू झालेल्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा महिनाभराच्या आतच बंद झाल्याने ...
वाशिम : वाढता काेराेना संसर्ग पाहता २७ जानेवारीपासून सुरू झालेल्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा महिनाभराच्या आतच बंद झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये ‘कही खुशी, कही गम’चे चित्र दिसून येत आहे.
काेराेनामुळे बंद झालेल्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून काेराेना नियमांचे पालन करीत सुरू करण्यात आल्या हाेत्या. काेराेना संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १७ फेब्रुवारी राेजी शाळा बंद ठेवण्याचा आदेश जारी केला. या आदेशामुळे अनेक दिवसांपासून शाळेत जाण्याची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांची अल्पावधीतच निराशा झाली. तर शाळेचा कंटाळा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असल्याचे पहिली ते पाचवीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी चर्चा केल्यावरून दिसून आले.
..................
काेराेनाचा उद्रेक पुन्हा वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांच्या १७ फेब्रुवारीच्या आदेशाने १८ फेब्रुवारीपासून शाळा बंद ठेवण्यात येणार, अशी माहिती मिळाल्याबराेबर मुलांना आनंद झाला. आधीच शाळेचा कंटाळा, त्यात हा निर्णय माझ्या पाल्यासह काहींना आनंदाचा वाटला.
- भागवत खानझाेडे,
पालक, वाशिम
..............
शाळा सुरू हाेणार असल्याने मुलांमध्ये आनंद झाला हाेता. काेराेनामुळे अनेक दिवसांपासून ऑनलाइन क्लासेसमुळे विद्यार्थी त्रस्त झाले हाेते. पुन्हा काेराेनाने डाेक वर काढल्याने शाळा बंदचे आदेश दिल्याने अनेक मुलांना दु:ख झाले आहे. माझ्या पाल्याने २७ जानेवारी राेजी शाळा सुरू हाेणार हाेती तेव्हा आनंद साजरा केला हाेता. परंतु पुन्हा शाळा बंद झाल्याने निराश झाल्याचे मत त्याने व्यक्त केले.
- राजेश अग्रवाल,
पालक, वाशिम
.............
वाशिम जिल्ह्यातील पाचवी ते आठवीच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्यात. काेराेना संसर्ग पाहता शाळा बंद ठेवण्याचे प्रशासनाने आवाहन केले हाेते. त्यामुळे शाळा बंद राहिल्यात. अशा वेळी शाळांनी ऑनलाइन क्लासेसवर भर देऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु आता पुन्हा शाळा बंद झाल्याने पाल्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ऑनलाइन क्लासेस पाल्यांना नकाेसे असल्याचे ते सांगताहेत.
- बाळू भाेयर, पालक, वाशिम
..............