प्लास्टिक कचरामुक्तीसाठी वाशिम येथील शाळेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:05 PM2018-02-17T15:05:59+5:302018-02-17T15:08:18+5:30
वाशिम: प्लास्टिकपासून मानवी जीवन, पशूपक्षी आणि पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेत स्थानिक सुशीलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने शनिवार १७ फेबु्रवारीला प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले.
वाशिम: प्लास्टिकपासून मानवी जीवन, पशूपक्षी आणि पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेत स्थानिक सुशीलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने शनिवार १७ फेबु्रवारीला प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले, तसेच कापड आणि कागदांपासून तयार केलेल्या पिशव्यांची प्रदर्शनी भरवून प्लास्टिक कचरामुक्तीचा संदेश दिला.
प्लास्टिक चा कचरा दिवसेंदिवस वाढत असल्याने पर्यावरण दुषित होऊन त्याचे परिणाम मानवी जीवनावर आहेत. पाण्यात पडणाऱ्या प्लास्टिक कचऱ्या मुळे जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला असून, रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यातील प्लास्टिक पिशव्या पोटात गेल्याने प्राण्यांच्या जिवालाही धोका निर्माण होत आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने प्लास्टिक मुक्ती अभियानही राबविण्यास सुरुवात केली आहे. शासनाच्या या अभियानाल हातभार लावून प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी वाशिम येथील सुशिलाबाई जाधव विद्यानिकेतनच्यावतीने रविवारी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिक कचरामुक्ती अभियान राबविले. शिवाय इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी कापड आणि जाड आकाराच्या टाकाऊ कागदांपासून आकर्षक पिशव्या तयार करून त्याची प्रदर्शनी शाळेत भरवित प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला. मुख्याध्यापिका भाकरे यांच्या मार्गदर्शनात राबविलेल्या या उपक्रमात साबळे, कढणे या शिक्षिकांनी प्लास्टिकमुक्तीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भागवतराव देशमुख आणि स्मिता कदम यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी ज्योती भाकरे, अशोक ढोके, हिप्पी भिरोड, अनिल गोरे, दूर्गा कढणे, राधा साबळे, जया आरू, राधेशाम गवळी, रघुनाथ करवते, निलेश मोरे, सागर जाधव, चित्रा धनगांवकर या शिक्षकवृंदांसह शिक्षकेतर कर्मचारी गजानन कव्हर, शोभा पाचरे, रुपाली काटकर आदिंचे सहकार्य लाभले.