शालेय साहित्य महागले; पालकांच्या खिशाला झळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 06:02 PM2019-06-23T18:02:49+5:302019-06-23T18:03:16+5:30
वाशिम : २६ जूनपासून शाळा सुरू होत असून, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत पालकांची एकच गर्दी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : २६ जूनपासून शाळा सुरू होत असून, विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत पालकांची एकच गर्दी होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पुस्तके, वह्या, गणवेश व अन्य साहित्याच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्य पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
विदर्भातील शाळांची पहिली घंटा २६ जून रोजी वाजणार आहे. दोन दिवसाने शाळा सुरू होणार असल्याने विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी बाजारपेठेत एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. गतवर्षी पेक्षा यंदा शैक्षणिक साहित्य महागले असून सात ते दहा टक्क्यांदरम्यान दरवाढ झाली आहे. वाढत्या महागाईमुळे अगोदरच त्रस्त झालेल्या पालकांच्या खिशाला दरवाढीमुळे कात्री लागली आहे. सामान्यत: कच्चा माल, पेट्रोल व डिझेल यांचे भाव वाढल्यामुळे यावर्षी शैक्षणिक साहित्यही महागले असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दप्तर व वह्यांचे दर वाढल्याचे दिसून येते. सरासरी १० टक्क्याने वाढ झाल्याने सर्वसामान्य पालकांचे बजेटही कोलमडत आहे. दप्तर व वह्यांचे दर वाढले आहेत. दोनशे पानी वह्या १४० ते ३२० रुपये डझन, ए फोर साईज वह्या २५० ते ६०० रुपये डझन, शंभर पानी वह्या १४० ते १६० रुपये डझन, दोनशे पेजेस लहान वह्या २८० ते ३०० रुपये तर मोठ्या वह्या ५६० ते ६०० रुपये डझन या दरम्यान किंमती आहेत. कापडावर जीएसटी लागू असल्याने दप्तराच्या किंमतीतही भरमसाठ वाढ झाली आहे. बाजारात दप्तरांची किंमत २०० रुपयापासून ते १२०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.