पुस्तकांची गुढी उभारून अभिनव पद्धतीने ‘प्रवेशोत्सव’, कामरगाव जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2018 08:52 PM2018-06-26T20:52:24+5:302018-06-26T20:53:08+5:30
आनंद, उत्साह आणि यश साजरे करण्यासाठी गुढी उभारल्या जाते. परंतु कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयांमध्ये २६ जूनला चक्क पुस्तकांची गुढी उभारुन प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कारंजा - आनंद, उत्साह आणि यश साजरे करण्यासाठी गुढी उभारल्या जाते. परंतु कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयांमध्ये २६ जूनला चक्क पुस्तकांची गुढी उभारुन प्रवेशोत्सव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प सदस्य मिना भोने तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य रवि भूते, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा देशमुख, पालक प्रतिनिधी संजय राऊत व लक्ष्मणराव लाकडे उपस्थित होते. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल. यावेळी पुस्तकांची गुढी उभारून प्रवेशोत्सव दिन साजरा केला.या गुढीवर ‘सारे शिकूया, पुढे जाऊया, गणित, वजाबाकी, बेरीज चिन्हे विविध शब्द या गुढीवर लावले होते. ही गुढी विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये फिरवली. ही गुढी शिक्षक गोपाल खाडे यांनी तयार केली होती. यावेळी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. जि.प.सदस्य भोने यांच्यावतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन निता तोडकर यांनी तर आभार वसंत चव्हान यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.