शालेय पोषण आहाराच्या तांदुळाचा अपहार?
By admin | Published: May 31, 2017 01:44 PM2017-05-31T13:44:07+5:302017-05-31T13:44:07+5:30
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी २२ क्विंटल तांदुळाचा अपहार केला.
वाकद : येथील जि.प.मराठी शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी २२ क्विंटल तांदुळाचा अपहार केला तसेच लग्नासाठी नियम बाहय पद्धतीने शाळा देउन त्या रक्कमेचाही अपहार केल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गजानन घोडके तथा इतर सदस्यांनी केली आहे.
येथील शाळेत १.५.२0१२ चा तांदूळ ४४ कट्टे (२२ क्विंटल ) जमा होता. यात सदर तांदूळ अध्यक्ष विष्णू मापारी व मुख्याध्यापक सुधिर सरकटे यांनी सदस्यांना माहीत न करता परस्पर तांदळाची विक्री केली. शिवाय शाळा सुरु असताना लोकांना लग्नासाठी शाळा दिली. त्याचे भाडे प्रत्येकी तिन हजार रुपये आकारले जाते; मात्र ६ ते ७ लग्नाचे पैसे परस्पर हडप केल्याचा आरोप तक्रार कर्त्यांनी केला आहे. त्याचप्रमाणे शाळा देखभाल दुरुस्तीचे १५000 व शाळा अनुदान १0000या रक्कमेचाही समिती सदस्यांना थांगपता लागू न देता अपहार केला. या सर्व बाबींची सखोल चौकशी करुन दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी गजानन घोडकेसह मनीष ढोले, ज्ञानेश्वर बोरकर, भास्कर कव्हरे, शोभा रामदास पोपळकर, मिना अमोल खनपटे, गजानन दत्ता तिटके, यांनी केली आहे. प्रतिलिपी जिल्हाधिकारी वाशिम शिक्षण सभापती वाशिम, गटविकास अधिकारी रिसोड सभापती पं.स. रिसोड, आयुक्त अमरावती यांचेकडे दिल्या आहेत.
जि.प.शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्ट्राचार आला नसून लग्नासाठीही नियमानुसारच शाळा दिलेली आहे. त्यामुळे सदर तक्रार करण्यामागे राजकीय षडयंत्र असु शकते.- विष्णू शंकर मापारी, अध्यक्ष शा.व्य.समिती, वाकद