दहावीच्या निकालास उशीर झाल्यास शाळाच जबाबदार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 10:06 AM2021-06-30T10:06:54+5:302021-06-30T10:07:55+5:30
SSC Result : दहावीच्या मुल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत.
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : दहावीच्या मुल्यमापन प्रक्रियेत शाळांच्या गुणदान प्रक्रियेसाठी केवळ चार दिवस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील जवळपास ८० टक्के शाळांनी हा टप्पा पूर्ण केला असून, उर्वरीत २० टक्के शाळांना लवकरच गुणदान प्रकियेचा टप्पा पूर्ण करावा लागणार आहे. दहावीच्या निकालास उशीर झाल्यास संबंधित शाळाच जबाबदार राहतील, असा इशारा शिक्षण विभागाने दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्याने गतवर्षी शाळा बंदच होत्या. त्यामुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्या. मुल्यमापनानुसार शाळांमध्ये गुणदान प्रक्रिया राबविली जात आहे.