ठरावानंतरही क्षतिग्रस्त वर्गखोल्या ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 02:51 PM2018-12-04T14:51:05+5:302018-12-04T14:51:18+5:30
वाशिम : तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद पा्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या गत दोन वर्षापूर्वी वादळ वाºयामुळे क्षतिग्रस्त झाल्या होत्या. या संदर्भात दुरुस्ती ठरावानंतरही आजपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद पा्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या गत दोन वर्षापूर्वी वादळ वाºयामुळे क्षतिग्रस्त झाल्या होत्या. या संदर्भात दुरुस्ती ठरावानंतरही आजपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना उन्हात, थंडीत बाहेर बसून शिक्षणाचे धडे घेण्याची वेळ आली आहे.
जि.प.प्राथमिक शाळा माळेगाव येथील वर्ग खोली व अंगणवाडी इमारत ही गेल्या दोन वर्षापासुन वादळी वाºयामुळे क्षतीग्रस्त झालेली असतांना तसेच यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने दोन वेळा ठराव व शिवसंग्राम संघटनेच्यावतीने दोन वेळा ा निवेदन दिले. परंतु अद्याप पर्यंत कुठल्याच प्रकारची ठरावाची किंवा निवेदनाची दखल घेतली नाही. अशा हलगर्जीपणामुळे माळेगाव येथील लहान चिमुकले गेल्या दोन वर्षापासुन उघड्यावर व उन्हात , थडीत ज्ञानार्जनासाठी बसत आहेत. परिणामी त्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या मुलांच्या भविष्याच्या व आरोग्याचा विचार करुन या प्रकरणाची तातडीने दखल घेण्यात यावी व तेथील वर्गखोल्यांचे बांधकाम त्वरित चालु करण्यात यावेत. अन्यथा शाळेतील विद्यार्थी पालकवर्ग व शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपोषणाला बसुन आपल्या प्रशासनाविरुध्द आवाज उठविला जाईल व होणाºया परिणामास आपण जबाबदार राहिल अशा आशयाचे निवेदन महादेव रामेश्वर उगले यांनी शिक्षणाधिकारी वाशिम यांना दिले आहे.