पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शाळेने उभारला ‘वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 05:27 PM2020-03-21T17:27:23+5:302020-03-21T17:28:35+5:30
वाशिम परिसरातील शाळेत उभारलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.
- नंदकिशोर नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : संभाव्य पाणी टंचाई वर मात करण्यासाठी स्थानिक एस. एम .सी. इंग्लिश स्कूल वाशिम मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारत संभाव्य पाणी टंचाई वर मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वी संस्थेला दरवर्षी उन्हाळ्यामध्ये एक ते दीड लाख रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत होते परंतु सदर हार्वेस्टिंग मुळे पाण्याची व पैशांची बचत झालेली आहे .उल्लेखनीय बाब म्हणजे वाशिम परिसरातील शाळेत उभारलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.
वाशिम येथील लाखाळा परिसरात नेहमीच पाणी टंचाई असते, तसेच दिवसेंदिवस पाण्याची पातळी हि खोल जात आहे. पाणी टंचाईचे चटके डिंसेबर महिन्यातच जाणवायला सुरुवात होते. एकतर भूगभार्तील पाण्याचा उपसा हा अधिक होतो परंतू त्याचे पुनर्भरण होत नाही यामुळे टंचाईच्या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते यावर मात करीत एस. एम. सी. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर व प्राचार्य मीना उबगडे यांच्या सहकायार्तुन राष्ट्रीय हरित सेना योजना अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला.यासाठी शाळेच्या परिसरातील असलेल्या इमारतीच्या छतावरील वाहुन जाणारे पाणी पाईप लाईनद्वारे शोष खड्डा तयार करून त्या शोष खड्डया मध्ये हे पाणी विंधन विहिरीमध्ये पुनर्भरण करण्यात आले आहे .अशा प्रकारे पावसाचे वाया जाणाºया पाण्याचा सदुपयोग करण्यात आला आहे. या रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामूळे भविष्यात शाळेच्या परिसरातील पाणी टंचाई वर मात करण्यास मदत झाली आहे .तसेच शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंग हे कागदोपत्री न राबविता सक्तीचे केले तर याचा निश्चितच फायदा होऊ शकतो व अशा प्रकारच्या योजनेचा ईतर लोकांनी आदर्श घेउन आपल्या घरात, शाळेत, कार्यालयात प्रकल्प राबवून पाणी टंचाईवर मात करावी असे आवाहन राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले आहे.