शाळा सुरु; बस नाही मग शाळेत जायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:47 AM2021-09-23T04:47:32+5:302021-09-23T04:47:32+5:30
दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटला, तरी बरेचसे विद्यार्थी अजूनही घरीच आहेत. एस. टी.अभावी अनेकांचे शैक्षणिक ...
दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू होऊन महिना उलटला, तरी बरेचसे विद्यार्थी अजूनही घरीच आहेत. एस. टी.अभावी अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी गावागावात शाळा आहेत, पण माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून सुमारे २२ ते २५ किलोमीटर दूर शहरातील किंवा परिसरातील मोठ्या गावात जावे लागते. यासाठी शासनाच्या एस. टी. सेवेचा वापर विद्यार्थी करतात. शाळा सुरू केल्या पण वाशीम, पिंपळगाव डांगबगलामार्गे अनसिंग मारवाडी, खंडाळा, पुसद अशा बऱ्याच ठिकाणी एस. टी. बस सुरू न केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अडचणीचे ठरत आहे. काही ठिकाणी खासगी गाड्यांमधून अतिरिक्त पैसे देऊन मुली व मुले शाळेत जात आहेत.
त्यामुळे वाशिम तालुक्यातील वाशिम उमरा (शम) ढिल्ली वाशिम पुसद पिंपळगाव डांगबगला अनसिंगमार्गे सकाळी ६ वाजता बस सुरु करावी, अशी मागणी ब्रम्हा, पिंपळगाव, उमरा, देगाव, जवळा, सापळी सोंडा, मारवाडी, खंडाळा वाई, वारला झोडगा येथील विद्यार्थी करत आहेत.