पंचायत समितीत भरली चिमुकल्यांची शाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:16 AM2017-08-04T01:16:34+5:302017-08-04T01:18:32+5:30
मंगरुळपीर : समायोजनातून नियुक्ती झाल्यानंतरही शिक्षिका शाळेवर रुजू होत नसल्याने तालुक्यातील चिखली येथील जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. या संदर्भात शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दखल न घेतल्याने पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने आक्र मक होत, २ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता पंचायत समितीतच विद्यार्थ्यांची शाळा भरविली. हा प्रकार कळल्यानंतर जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी थेट मंगरुळपीर पंचायत समिती कार्यालय गाठले आणि गटशिक्षणाधिकारी व बीडीओ यांना बोलावून सदर शिक्षिकेस तत्काळ चिखली येथील शाळेवर रुजू होण्याचा आदेश काढण्याची सूचना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

मंगरुळपीर तालुक्यातील चिखली येथे प्राथमिक शाळा आहे. या शाळेत शिक्षकांची दोन पदे रिक्त होती. अशातच जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या शिक्षण समायोजन प्रक्रियेंतर्गत दोन्ही रिक्त पदांवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. यातील एका शिक्षिकेने आपला पदभार सांभाळला, तर मंगरुळपीर शहरातील जि.प. शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका मात्र रुजू होत नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आशिष चौधरी यांच्यासह पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने ही समस्या पं.स. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे मांडली. त्यावरुन गटशिक्षणाधिकार्यांनी जि.प. शाळा मंगरुळपीरच्या मुख्याध्यापकांना २८ जुलै रोजी पत्र पाठवून चिखली येथे समायोजनातून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षिकेला कार्यमुक्त करण्याचा आदेश दिला. तथापि मंगरुळपीर जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. या प्रकारामुळे चिखली येथील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन आशिष चौधरी यांनी पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह शाळेतील विद्यार्थी पंचायत समितीत आणून, तिथेच शाळा भरवून निषेध केला. जि.प. उपाध्यक्ष चंदक्रांत ठाकरे यांनी यावेळी मंगरुळपीर पंचायत समिती गाठली आणि पं.स.गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांना या प्रकरणासंदर्भात जाब विचारला. तसेच चिखली शाळेत रुजू होण्यास टाळाटाळ करणार्या शिक्षिकेला तत्काळ बोलावुन शाळेवर रुजू होण्याचा आदेश काढण्याची सूचना केली. अधिकार्यांनी जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या सूचनेनुसार सदर शिक्षिकेला बोलावून चिखली शाळेवर रुजू होण्याचा आदेश दिला. त्यानंतर चिखली येथील पालक वर्ग व शाळा व्यवस्थापन समितीने आपले आंदोलन मागे घेतले.