लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट
By admin | Published: February 5, 2017 02:09 AM2017-02-05T02:09:55+5:302017-02-05T02:09:55+5:30
चार लाख रुपये जमा; येवता शाळेला ‘डिजिटल’ची जोड.
येवता( जि. वाशिम), दि. ४- पालक व दानशूरांच्या चार लाख रुपये लोकवर्गणीतून येवता येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचा कायापालट झाला आहे.
रिसोड तालुक्यातील मसलापेन केंद्रांतर्गत येणार्या येवता जि.प. शाळेत १ ते ७ वर्ग आहेत. लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेला डिजिटलची जोड देण्याबरोबरच शाळा ह्यबोलकीह्ण बनविण्यासाठी शिक्षकांनी पालक व गावकर्यांच्या सहकार्यातून प्रयत्न केले. गावकरी, पालक, शिक्षक यांच्यासह दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने जि.प. शाळेसाठी तबल ४ लाख रुपये रुपये लोकवर्गणी जमा झाली. यामधून संपूर्ण वर्ग डिजिटल, विद्यार्थ्यांंसाठी ह्यवॉटर फिल्टरह्ण, विविध खेळ साहित्य उपलब्ध करण्यात आले. शाळेच्या भिंती रंगविण्यात आल्या असून बोलकी शाळा बनविण्यात आली. सामान्य ज्ञान स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर ज्ञानरचनावाद अध्ययन-अध्यापन आदी उपक्रम घेतले जातात. प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे यांच्या हस्ते या शाळा खोल्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य कावेरी अवचार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक अवचार, माजी पं.स. सदस्य दिनकर चोपडे, केंद्रप्रमुख मंदाकिनी खेते, मुख्याध्यापक अंभोरे, शिक्षक बोरकर, चव्हाण, आरू, नवघरे यांच्यासह शिक्षक मंडळी, गावकरी पालक व विद्यार्थी हजर होते. संचालन शंकर बोरकर तर आभार सूचित नवघरे यांनी मानले.