विद्यार्थ्यांना नियमित योगाचे धडे देणारी शिरपूर येथील जिल्हा परिषदेची शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:09 PM2018-03-12T13:09:57+5:302018-03-12T13:09:57+5:30
शिरपुर जैन(वाशिम) - शिरपूर जैन येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासह मुलींना नियमितपणे योगाचे धडे देण्याचे काम शाळेचे शिक्षक करीत असून ईतरही शाळा या शाळेची प्रेरणा घेताना दिसून येत आहेत.
शिरपुर जैन(वाशिम) - शिरपूर जैन येथील जिल्हा परिषद कन्या मराठी शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासह मुलींना नियमितपणे योगाचे धडे देण्याचे काम शाळेचे शिक्षक करीत असून ईतरही शाळा या शाळेची प्रेरणा घेताना दिसून येत आहेत.
मालेगाव तालुक्यातील शिरपुर जैन येथील १०० टक्के डिजीटल असलेली जि.प.कन्या शाळा आहे. या शाळेत एकुण १५१ मुली, पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापक आशा नागपुरकरसह शिक्षकांच्या पुढाकाराने खर्च करुन व लोकवर्गणी करुन जानेवारी २०१७ शाळा संपूर्णपणे डिजीटल करुन घेतली. त्याचा मोठा फायदा शिक्षण घेणाºया मुलींना होत असल्याचे दिसत आहे. जीवनात योगाचे महत्व पाहता आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना योगाचे धडे देण्यासाठी मुख्याध्यापकासह शिक्षकांची सकारात्मक चर्चा झाली. चर्चेनंतर योगाचे धडे विद्यार्थ्यांना कोण देणार यावर मंथन झाले असता अनेक शिक्षक स्वत: योगा करीत असल्याने त्याची संपूर्ण माहिती त्यांना दिसून आली. योगाबाबत परिपूर्ण ज्ञान अवगत करुन शिक्षकांनी योगा शिकवण्याचे कार्य हाती घेतले. आज शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना केवळ योगाचे नाव घेवून योगा करण्याचे सांगितल्याबरोबर एकतालात सर्वजण योगा करतात. या शाळेतील या उपक्रमाची माहिती जिल्हयातील ईतर शाळांना मिळाल्याने अनेक शाळेतील शिक्षकांनी भेटी देवून योगा पध्दत व ते राबविण्याची पध्दत सुध्दा जाणून घेतली. या एकमेव शाळेमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिल्या जात असल्याने ईतरही शाळेत या शाळेचा आदर्श घेवून लवकरात लवकर योगाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जाणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक रवि बालटकर, हरिश्चंद्र लवटे, विजय अवचार, स्वाभीमान व्यवहारे, पंडीतराव सरनाईक, रुपाली पुरोहीत हे शिक्षक मुलींना शारिरीक दृष्ट्या तंदुरुस्तीसाठी नियमितपणे योगाचे धडे देण्याचे काम करीत आहे. एकेकाळी शिक्षणाच्या जीव छोट्या स्पर्धेमुळे ओस पडणाºया जि.प.शाळा आता शिक्षणासह विविध उपक्रमामुळे पुन्हा गजबजल्या आहेत.
आमच्या जिल्हा परिषद कन्या शाळेत शिक्षण घेणाºया जवळपास सर्वच मुली हया कष्टकरी, कामकरी, मजुर कुटुंबातील आहेत. त्यांना योग्य शिक्षण व आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबवून त्यांच्यामध्ये शाळेची ओढ कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातीलच एक भाग योगाचे धडे असून गत तीन ते चार वर्षांपासून सतत हा उपक्रम सुरु असून विद्यार्थ्यांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
- आशा नागपूरकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद कन्या शाळा शिरपूर