शाळांमध्ये गुंजणार सदभावनेचे सूर !
By Admin | Published: August 13, 2016 01:21 AM2016-08-13T01:21:53+5:302016-08-13T01:21:53+5:30
२0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान शासकीय कार्यालयांप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांमध्येही सद्भावना शपथ व सद्भावना शर्यतीचा कार्यक्रम.
वाशिम, दि. १२: सद्भावना दिन आणि सामाजिक ऐक्य पंधरवड्याचे औचित्य साधून २0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान शासकीय कार्यालयांप्रमाणेच शाळा-महाविद्यालयांमध्ये सद्भावना शपथ व सद्भावना शर्यत आयोजित करून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जाणार आहे. या दृष्टिकोनातून आतापासूनच सर्व शासकीय कार्यालय प्रमुख, शाळा-महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती २0 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी ह्यसद्भावना दिवसह्ण म्हणून साजरा करण्यात येतो. सद्भावना दिवसाच्या अनुषंगाने यावर्षीपासून २0 ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान ह्यसामाजिक ऐक्य पंधरवडाह्ण म्हणून साजरा केला जाणार आहे. एकमेकांविषयी ऐक्याची भावना, सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवून पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन करण्याच्या सूचना राज्य शासनाने सर्व जिल्हा प्रशासनाला दिलेल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात सद्भावना शपथ व सद्भावना शर्यत आयोजित करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याच्या सूचना सर्व विभागप्रमुख व शाळा-महाविद्यालयांना दिल्या.