खेळाडूंच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस शाळांची टाळाटाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:44 PM2019-04-02T15:44:34+5:302019-04-02T15:44:56+5:30

वाशिम : कुठल्याही स्वरूपातील वैयक्तिक अथवा सांघीक खेळांमध्ये सहभागी व्हायचे असल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांच्या क्रीडा शिक्षकांमार्फत ठराविक ‘सॉप्टवेअर’मध्ये आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याने अनेक प्रतिभावान खेळाडू क्रीडा स्पर्धांपासून वंचित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Schools avoid to online enrollment of players | खेळाडूंच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस शाळांची टाळाटाळ!

खेळाडूंच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस शाळांची टाळाटाळ!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कुठल्याही स्वरूपातील वैयक्तिक अथवा सांघीक खेळांमध्ये सहभागी व्हायचे असल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांच्या क्रीडा शिक्षकांमार्फत ठराविक ‘सॉप्टवेअर’मध्ये आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याने अनेक प्रतिभावान खेळाडू क्रीडा स्पर्धांपासून वंचित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शालेय स्तरावरील खेळाडूंसाठी साधारणत: ५० क्रीडा प्रकार असून १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडू त्यासाठी पात्र ठरविले जातात; परंतु खेळांमध्ये सहभाग घेण्यापूर्वी नियमानुसार त्या-त्या खेळांसाठी आकारले जाणारे ठराविक शुल्क भरून ‘आॅनलाईन’ नोंदणी करणे आवश्यक असते. २०१७ पर्यंत ही प्रक्रिया ‘आॅफलाईन’ स्वरूपात राबविली जायची. मात्र, २०१८ नंतर सर्व शाळांना यू-डाईस क्रमांक, यूजर आय-डी, पासवर्ड देवून शालेय खेळाडूंची ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्याच्या सूचना क्रीडा विभागाकडून देण्यात आल्या. असे असले तरी शाळांकडे या कामासाठी पुरेसा फंड नसणे, अनेक शिक्षकांना संगणकीय पुरेसे ज्ञान नसणे, संगणकांना लागणारी वीज, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे आदी समस्यांमुळे क्रीडा शिक्षकांकडून खेळाडूंच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधील खेळाडूंची ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी आकारले जाणारे नाममात्र शुल्क देखील क्रीडा विभागाकडे जमा झालेले आहे. असे असले तरी ‘आॅनलाईन’ नोंदणी प्रक्रियेची गती वाढणे गरजेचे आहे.
- प्रदिप शेटिये
जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम

Web Title: Schools avoid to online enrollment of players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.