वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव पाठविण्यास शाळांची दिरंगाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:46 AM2021-08-25T04:46:01+5:302021-08-25T04:46:01+5:30
ग्रामीण भागात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या जवळपास २७५ शाळा आहेत. यामध्ये कारंजा तालुक्यातील ४५, मालेगाव ४४, मंगरूळपीर ३९, मानोरा ...
ग्रामीण भागात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या जवळपास २७५ शाळा आहेत. यामध्ये कारंजा तालुक्यातील ४५, मालेगाव ४४, मंगरूळपीर ३९, मानोरा ४६, रिसोड ५३ व वाशिम तालुक्यातील ४८ शाळांचा समावेश आहे. २७५ शाळांवर जवळपास २९०६ शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून १२ वर्षे सेवा दिल्यानंतर संबंधित शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू केली जाते. यासाठी संबंधित शाळांकडून शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक असून, काही शाळांकडून तातडीने प्रस्ताव पाठविण्यात येतात, तर काही शाळांकडून प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
१२ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर किमान वर्षभरात तरी वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव संबंधित शाळांनी शिक्षण विभागाकडे सादर करणे शिक्षकांना अपेक्षित आहे. मात्र, दोन, दोन वर्षांपर्यंत काही शाळा वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव पाठवित नसल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या काही शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
००००
कोट
१२ वर्षे सेवा दिलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. बहुतांश शाळांकडून वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव येत आहेत. १२ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवावेत, अशा सूचना शाळांना दिलेल्या आहेत.
- रमेश तांगडे
शिक्षणाधिकारी (माध्यमिक), वाशिम