शुल्कासाठी शाळांचा तगादा, तक्रार सोडवायची कुणी? अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:54+5:302021-07-14T04:45:54+5:30

वाशिम : शुल्कांसाठी काही शाळांचा तगादा, आरटीई अंतर्गत कमी अंतरावर घर असूनही नजीकच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही यासह विविध ...

Schools for fees, who wants to solve the complaint? 60% vacancies for officers! | शुल्कासाठी शाळांचा तगादा, तक्रार सोडवायची कुणी? अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त !

शुल्कासाठी शाळांचा तगादा, तक्रार सोडवायची कुणी? अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त !

Next

वाशिम : शुल्कांसाठी काही शाळांचा तगादा, आरटीई अंतर्गत कमी अंतरावर घर असूनही नजीकच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही यासह विविध प्रकारच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शिक्षण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळच नसल्याने तक्रार सोडवायची कुणी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह तीन उपशिक्षणाधिकारी व चार गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.

शालेय शैक्षणिक शुल्क, प्रवेश प्रक्रिया, शालेय पोषण आहाराचा दर्जा, अनधिकृत शाळा यासह विविध स्वरुपातील तक्रार शिक्षण विभागाकडे प्राप्त होत असतात. या तक्रारींचा निपटारा करण्याबरोबरच शालेय कामकाज सुरळीत चालण्यासाठी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आदी पदांची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यात अधिकाऱ्यांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणविषयक तक्रारींचा निपटारा करताना कार्यरत अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.

००००००००००००००

जिल्ह्यातील शाळा १,४१९

शासकीय शाळा ८१३

अनुदानित १८४

विनाअनुदानित ४२२

००००००००००००

पद एकूण पदे रिक्त

शिक्षणाधिकारी२१

उपशिक्षणाधिकारी ४३

गटशिक्षणाधिकारी६२

०००००००००००००००००००

तक्रारी सोडवायच्या कोणी?

१) शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी काही शाळांचा तगादा असतो. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना काही शाळा डोनेशनची मागणी करतात, विशिष्ट विक्रेत्यांकडूनच शालेय गणवेश, पुस्तके घेण्याचा आग्रह केला जातो आदी स्वरुपातील काही तक्रारी शिक्षण विभागाकडे केल्या जातात.

२) आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश देताना अन्याय झाला, शालेय पोषण आहाराचा दर्जा व्यवस्थित नाही, शाळेत काही शिक्षक नियमित वेळेवर येत नाहीत,

३) या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी शिक्षण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ कार्यरत असणे अपेक्षित आहे. मात्र, जवळपास अधिकाऱ्यांची ७० टक्के पदे रिक्त असल्याने, तक्रारी सोडवायच्या कुणी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

००००००००००००००

पालक म्हणतात, तक्रारींचा निपटारा व्हावा

कोट

शैक्षणिक शुल्क, पोषण आहाराचा दर्जा यासह विविध प्रकारच्या तक्रारी झाल्यानंतर, या तक्रारींचा निपटारा होणे आवश्यक असते. यासाठी अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे.

- विशाल देबाजे

पालक

००००

शिक्षण विभागात महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने पालकांच्या तक्रारींचा निपटारा वेळेत होत नाही. उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत.

- योगेश उबाळे

पालक

००००

रिक्त पदे भरण्यात यावी

शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा प्रशासकीय ताण साहजिकच इतरांवर पडतो. वाशिम जिल्ह्यात अधिकाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त असल्याने ही पदे भरण्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित आहे.

- हेमंत तायडे

जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब संघटना

००

शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची पदे रिक्त असली तरी प्रशासकीय कामकाज समाधानकारक असल्याचे दिसून येते. प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळावी याकरिता अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरणे आवश्यक ठरत आहे.

- संतोष शिकारे,

नेते, महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती

Web Title: Schools for fees, who wants to solve the complaint? 60% vacancies for officers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.