अखेर विद्यार्थ्यांविनाच शाळा झाल्या सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:28 AM2021-07-02T04:28:03+5:302021-07-02T04:28:03+5:30
दरवर्षी नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पाल्यांना शाळेत प्रवेश मिळवून देणे, त्यासाठी लागणाऱ्या वह्या, पुस्तके, पेन, पाटी, दप्तर, गणवेश ...
दरवर्षी नवे शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी पाल्यांना शाळेत प्रवेश मिळवून देणे, त्यासाठी लागणाऱ्या वह्या, पुस्तके, पेन, पाटी, दप्तर, गणवेश आदी साहित्य खरेदीची लगबग सुरू होते; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गतवर्षीचे शैक्षणिक सत्र अर्ध्यावर थांबवावे लागले. यंदाही संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याचा सर्वाधिक धोका मुलांना असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्या; मात्र, विद्यार्थ्यांना प्रवेश नसून केवळ शिक्षकांनी हजर राहण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. शिक्षकांनी दैनंदिन शाळेत यायचे आणि विद्यार्थ्यांना गतवर्षीप्रमाणेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे द्यायचे, अशी पद्धत अंगीकारण्यात आलेली आहे. त्यानुसार, ऑनलाईन शिक्षणाचे पहिले सत्र सुरू झाले आहे; मात्र त्यास विद्यार्थ्यांमधून फारसा प्रतिसाद लाभत नसल्याचे काही शिक्षकांनी सांगितले.