‘प्रवेशोत्सव’ नियोजनाकडे शाळांनी फिरवली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2015 02:00 AM2015-06-26T02:00:21+5:302015-06-26T02:00:21+5:30

वाशिम जिल्ह्यातील शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या सूचनांची अंमलबजावणी नाही.

The schools have started exploring the 'Entrepreneurship' scheme | ‘प्रवेशोत्सव’ नियोजनाकडे शाळांनी फिरवली पाठ

‘प्रवेशोत्सव’ नियोजनाकडे शाळांनी फिरवली पाठ

Next

नंदकिशोर नारे / वाशिम: विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत यावे, यासाठी राज्यभर विविध स्तर आणि पातळयांवर नवोपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विदर्भात २६ जून रोजी प्रारंभ होत आहे. शाळा सुरु होण्याच्या प्रथम दिवशी सर्व शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांंच्या स्वागतासाठी ह्यशाळा प्रवेशोत्सवह्ण कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला तशा सूचनाही केल्या आहेत; मात्र शाळा प्रवेशोत्सव नियोजन कार्यक्रम बहुतांश शाळेने राबविला नसल्याचे २५ जून रोजी लोकमतच्या चमुने केलेल्या पाहणीत आढळून आले
जिल्ह्यातील शाळा २६ जून रोजी उघडणार असल्याने ५ जून सकाळी ७ वाजता सर्व क्षेत्रिय अधिकार्‍यांसह शिक्षकांचे शाळेत आगमन , प्रवेशपात्र बालकांची यादी ग्रामपंचायत व शाळा फलकावर प्रदर्शित करणे, सकाळी ७.३0 वाजता गावात लाऊडस्पिकरद्वारा विद्यार्थ्यांंना शाळेत पाठविण्याची विनंती करणे, शिक्षकांचा गट तयार करुन घरांना भेटी देणे अपेक्षित होते. याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसह प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेणे, ९ ते १0.३0 वाजता युवकांच्या, गावकरी, बचत गटाच्या सहकार्यांंने शाळा परिसर स्वच्छ करणे, सडा- सारवण, तोरण बांधणे, देशभक्तीपर गीत वाजविणे अशा सूचना शिक्षण विभागाच्यावतीने संबधित शाळांना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. सूचना दिल्यानंतर त्याचा पाठपुरावा न केल्याने 'लोकमत' चमूने केलेल्या पाहणीमध्ये शाळांमध्ये कुठेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून आले.
यासंदर्भात एका केंद्रप्रमुखाशी संपर्क साधला असता नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले, अगोदरल्या दिवशी कोणीच नियोजन करीत नाही. सर्व जण सकाळी जावून कार्यक्रमाचे नियोजन करतील, अशी माहिती दिली. याबाबत माध्यामिक शिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळून आला. प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी जिल्हयातील सर्व शाळांना या कार्यक्रमांच्या सूचना देण्यात आल्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांंना शाळेची गोडी लागावी याकरिता शासन नवनवीन उपक्रम राबविते; परंतु संबधितांच्या दुर्लक्षामुळे ते यशस्वीपणे राबविले जात नसल्याचे यावरून दिसून येते.

Web Title: The schools have started exploring the 'Entrepreneurship' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.