प्रखर उन्हात चिमुकल्यांनी पक्ष्यांसाठी बनविले पाणीपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:40 AM2021-03-21T04:40:57+5:302021-03-21T04:40:57+5:30

श्री बाकलीवाल शाळेत ऑनलाईन क्राफ्ट वर्क स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन टाकाऊ वस्तूंपासून पाणीपात्र व ...

In the scorching sun, watering cans made for birds | प्रखर उन्हात चिमुकल्यांनी पक्ष्यांसाठी बनविले पाणीपात्र

प्रखर उन्हात चिमुकल्यांनी पक्ष्यांसाठी बनविले पाणीपात्र

Next

श्री बाकलीवाल शाळेत ऑनलाईन क्राफ्ट वर्क स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन टाकाऊ वस्तूंपासून पाणीपात्र व अन्नपात्र बनविले. या स्पर्धेत रोशन बाजड, अमन लहाने, आनंद वाघमारे, रोहन पायघन, प्रीतम कान्हेड, तृप्ती वानखेडे, प्रणव कोल्हे, विशाल आलमवार, कृष्ण महाले, ओम गायकवाड, स्पंदन चौधरी, प्रणय राठोड, यश सोनकर, देवा दाभाडे, हरिओम भोयर, सोहम निकम, यशोमित्र दापूरकर, पल्लवी वानखेडे, दिव्या लहानकर, रुद्राक्षी गावंडे, श्रुष्टी कुटे, प्रियंका कावलकर, वेदांती वाघ, नंदिनी वानखेडे, रितू शिंदे, भावना जाधव, कीर्ती बकाल, पायल ढेकणे, खुशी तोळंबे, अंजली घुगे, विश्वजा देशमुख, शिवानी देशमाने, श्रेया झुंजारे, आकांक्षा पवार, भूमी यादव, उमा काटकर यांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक बिल्लारी, उपमुअ दंभीवाल, पर्यवेक्षिका भोंडे, कलाशिक्षक काळे यांनी कौतुक केले. वाशिम : उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वत्र प्रखर उन्हाने अंगाची लाहीलाही होत असताना चिमणी, कबुतर, कावळे, आदी पक्षीही पाण्याविना कासावीस होत आहेत. ही बाब लक्षात घेता पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी व अन्न मिळावे या हेतूने २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कलाशिक्षक अमोल काळे यांच्या मार्गदर्शनात पाणी व अन्नपात्र बनवून पक्ष्यांची सोय केली.

Web Title: In the scorching sun, watering cans made for birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.