स्काऊट-गाईडस जिल्हा मेळाव्याचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 02:59 PM2019-02-18T14:59:04+5:302019-02-18T14:59:09+5:30

कारंजा : वाशिम भारत स्काउटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय , जि.प.वाशिम व  बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी  यांचे संयुक्त विद्यमाने बाबासाहेब धाबेकर माध्यमीक विद्यालय यावर्डी येथे आयोजित दोन दिवसीय जिल्हा मेळाव्याचा समारोप करण्यात आला.

Scout-Guides District Meeting concludes | स्काऊट-गाईडस जिल्हा मेळाव्याचा समारोप

स्काऊट-गाईडस जिल्हा मेळाव्याचा समारोप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा : वाशिम भारत स्काउटस आणि गाईडस जिल्हा कार्यालय , जि.प.वाशिम व  बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डी  यांचे संयुक्त विद्यमाने बाबासाहेब धाबेकर माध्यमीक विद्यालय यावर्डी येथे आयोजित दोन दिवसीय जिल्हा मेळाव्याचा समारोप करण्यात आला.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्य मुख्यालय, आयुक्त मुंबईचे वसंतराव काळे होते. प्रमुख अतिथी म्हणुन जि.प.सदस्य गजानन  अमदाबादकर, यावर्डी सरपंच पल्लवी जमाले, उपसरपंच  कैलास कापसे,  पोलिस पाटील सुनिल ठाकरे, कारंजा खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाबाराव ठाकरे, तहसीलदार रणजीत भोसले, सहा.राज्य आयुक्त स्काउट मुंबई रमेश चांदुरकर, सहा.राज्य आयुक्त गाईड रजनी धानोरकर, माजी राज्य चिटणीस भारत स्काउट गाईड मुंबई रामकृष्ण गावंडे, वाशिम भारत स्काउट गाईडचे उपाध्यक्ष गणेशराव काळे, वाशिम जिल्हा आयुक्त स्काउट प्रा.एस.आर.पुंड, वाशिम जिल्हा आयुक्त गाईड अलकाताई रावसाहेब ,मेळावा प्रमुख सुधाताई इंगोले, विशेष निमंत्रीत अशोक उपाध्ये, जिल्हा संघटन आयुक्त राजेश गावंडे, संस्था सचिव देविदास काळबांडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय भड आदि मान्यवर उपस्थित होते. सत्कारमुर्ती म्हणुन महाराष्ट्र्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अजय मोटघरे व अर्जुन वरघट तर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक पवार उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्काउट जिल्हा आयुक्त प्रा.एस.आर.पुंड यांनी केले. मान्यवरांच्या मनोगतानंतर उपस्थित मान्यवर तथा सत्कारमुर्ती यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्हा मेळाव्यामध्ये आयोजित विविध स्पर्धेत विजयी झालेल्या चमुचे उपस्थित मान्यवरांचेहस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवुन सन्मान करण्यात आला.
 मेळाव्याचे खास आकर्षण ठरलेल्या साहसी स्पर्धा व कारंजा लोकनृत्य गिताचे कौतुक अध्यक्षीय भाषणात राज्य मुख्यालय आयुक्त वसंतराव काळे यांनी केले.  समारोपीय कार्यक्रमाचे संचालन अरुणाताई देशमुख व सुधाताई इंगोले यांनी तर आभार जिल्हा संघटन आयुक्त राजेश गावंडे यांनी केले.
 
७६०स्काऊट-गाईडस चा सहभाग
स्काऊट - गाईडसच्या या जिल्हा  मेळाव्यात ६१ तंबु उभारण्यात आले होते. त्यामध्ये २५१ गाईडस, ५०९ स्काउटस व १०० शिक्षक शिक्षीका असे एकुण ८६० जन सहभागी झाले होते. परिसरातील सर्वात मोठा मेळावा असल्याचे मान्यवरांनी यावेळी आपल्या भाषणात नमूद केले.

Web Title: Scout-Guides District Meeting concludes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम