१२९ उमेदवारी अर्जांची छाननी, दोन अर्ज बाद! ५५ ग्रामपंचायतींच्या ९२ जागांसाठी पोटनिवडणूक

By संतोष वानखडे | Published: May 3, 2023 06:12 PM2023-05-03T18:12:34+5:302023-05-03T18:12:49+5:30

छाननीत तीन अर्ज बाद झाले असून, १२६ अर्ज वैध ठरले.

Scrutiny of 129 candidature applications, two applications rejected! By-elections for 92 seats of 55 Gram Panchayats | १२९ उमेदवारी अर्जांची छाननी, दोन अर्ज बाद! ५५ ग्रामपंचायतींच्या ९२ जागांसाठी पोटनिवडणूक

१२९ उमेदवारी अर्जांची छाननी, दोन अर्ज बाद! ५५ ग्रामपंचायतींच्या ९२ जागांसाठी पोटनिवडणूक

googlenewsNext

वाशिम : जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या ९२ सदस्य पदांच्या जागांसाठी १८ मे रोजी पोटनिवडणूक होणार असून, ३ मे रोजी सदस्य पदासाठीच्या १२५ आणि सरपंच पदासाठीच्या ४ अशा एकूण १२९ उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीत तीन अर्ज बाद झाले असून, १२६ अर्ज वैध ठरले.

राज्य निवडणूक आयोगाने ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत विविध कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकीसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला. जिल्ह्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या एकूण ९२ रिक्त सदस्यांसाठी आणि ५ रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी येत्या १८ मे रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीमुळे पुन्हा एकदा गावकीचे राजकारण तापत आहे. २५ एप्रिल ते २ मे या कालावधीत सदस्य पदासाठी १२४ जणांनी १२५ उमेदवारी अर्ज दाखल केले तर सरपंच पदासाठी चार अर्ज दाखल झाले होते. ३ मे रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.

यामध्ये तीन अर्ज अवैध ठरले असून, १२६ अर्ज वैध ठरले. ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल व दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह वाटप करून अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. १८ मे रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. १९ मे रोजी मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात येईल.

Web Title: Scrutiny of 129 candidature applications, two applications rejected! By-elections for 92 seats of 55 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.