छाननीत सरपंच पदाचे १७; सदस्य पदाचे ८७ अर्ज बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:58 AM2017-09-26T01:58:11+5:302017-09-26T01:58:18+5:30

वाशिम: ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हय़ातील २७३  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ सप्टेंबरपर्यंत दाखल  उमेदवारी अर्जांपैकी एकूण १0४ अर्ज सोमवारच्या छाननीत बाद  ठरले. यामध्ये सरपंच पदाचे १७ तर सदस्य पदासाठीच्या ८७  अर्जांचा समावेश आहे. 

Scrutinye sarpanch 17; Member post of 87 post! | छाननीत सरपंच पदाचे १७; सदस्य पदाचे ८७ अर्ज बाद!

छाननीत सरपंच पदाचे १७; सदस्य पदाचे ८७ अर्ज बाद!

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या मुदत

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: ७ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या जिल्हय़ातील २७३  ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ सप्टेंबरपर्यंत दाखल  उमेदवारी अर्जांपैकी एकूण १0४ अर्ज सोमवारच्या छाननीत बाद  ठरले. यामध्ये सरपंच पदाचे १७ तर सदस्य पदासाठीच्या ८७  अर्जांचा समावेश आहे. 
आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ संपत  असल्याने जिल्हय़ातील २७३ ग्रामपंचायतींची निवडणूक ७  ऑक्टोबर रोजी होत आहे. वाशिम तालुक्यातील ५१ ग्राम पंचाय ती, कारंजा ५३, मालेगाव तालुक्यातील ४८, रिसोड तालुक्या तील ४५, मानोरा तालुक्यातील ४१ आणि मंगरूळपीर तालुक्या तील ३५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. २२ सप्टेंबरपर्यंत दाखल  उमेदवारी अर्जाची सोमवार, २५ सप्टेंबर रोजी तहसील स्तरावर  छाननी करण्यात आली. वाशिम तालुक्यातून १५ ते २२ सप्टेंबर  या दरम्यान सरपंच पदासाठी एकूण २९८ तर सदस्य पदासाठी  ९७१ अर्ज दाखल झाले होते. सोमवारच्या छाननीत सरपंच  पदाचे चार अर्ज तर सदस्य पदाचे १५ अर्ज बाद झाले. आता सर पंच पदासाठी २९४ व सदस्य पदासाठीचे ९५६ अर्ज पात्र ठरले  आहेत.
कारंजा तालुक्यातून सरपंच पदाच्या ५३ जागेसाठी २३९ अर्ज  दाखल झाले होते. यापैकी छाननीत एक अर्ज बाद झाला असून,  आता २३८ अर्ज पात्र ठरले आहेत. सदस्य पदाच्या ३९७  जागेसाठी ७५0 अर्ज दाखल होते. यापैकी ९ अर्ज बाद झाल्याने  आता ७४१ अर्ज पात्र आहेत.
मानोरा तालुक्यातून सरपंच पदाच्या ४१ जागेसाठी १८६ अर्ज  दाखल झाले होते. यापैकी छाननीत एक अर्ज बाद झाला असून,  आता १८५ अर्ज पात्र ठरले आहेत. सदस्य पदाच्या ३४२  जागेसाठी ६७२ अर्ज दाखल होते. यापैकी १३ अर्ज बाद ठरले.  रिसोड तालुक्यातून सरपंच पदासाठी एकूण २१६ तर सदस्य  पदासाठी ८७३ अर्ज असे एकूण १,0८९ अर्ज दाखल झाले होते.  छानणीत सदस्य पदाचे एकूण २0 अर्ज बाद झाले तर सरपंच  पदाचा एकही अर्ज बाद ठरला नाही. आता १,0६९ अर्ज पात्र  ठरले आहेत. मंगरूळपीर तालुक्यात सरपंच पदासाठी २0४ अर्ज  दाखल होते. यापैकी दोन अर्ज बाद झाल्याने आता २0२ अर्ज  पात्र आहेत. सदस्य पदासाठी ६४४ अर्ज दाखल होते. यापैकी ८  अर्ज बाद झाल्याने आता ६३६ अर्ज पात्र आहेत. मालेगाव तालु क्यातून सदस्य पदासाठी ८५४ अर्ज दाखल होते. यापैकी २२  बाद ठरले तसेच सरपंच पदासाठी २५५ अर्ज होते. यापैकी ९  बाद ठरले. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज  मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 

Web Title: Scrutinye sarpanch 17; Member post of 87 post!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.