आधार कार्ड केंद्राला सील
By admin | Published: September 1, 2015 01:42 AM2015-09-01T01:42:11+5:302015-09-01T02:12:57+5:30
जास्त पैसे घेऊन आधार कार्ड देणा-या आधार कार्ड केंद्रावर तहसीलदार सोनाली मेटकरी यांची कारवाई.
मालेगाव (जि. वाशिम): जास्त पैसे घेऊन आधार कार्ड देणार्या एका आधार कार्ड केंद्रावर तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी ३१ ऑगस्ट रोजी कारवाई केली आहे. सदर आधार कार्ड केंद्र सील केले आहे. आधार केंद्रावर जास्तीचे पैसे घेऊन आधार कार्ड काढून दिल्या जाते, अशी तक्रार तहसीलदार मेटकरी यांना प्राप्त झाली होती. मेटकरी यांनी सदर केंद्रात जाऊन शहानिशा केली आणि जास्त पैसे घेत असल्याचे आढळून आल्याने अमित ढोले यांचे आधार केंद्र सील केले. तसेच तलाठी कार्यालयामागील पडिक विहीरीची साफसफाई करण्याचे निर्देशही तहसीलदार मेटकरी यांनी नगर पंचाय तीच्या कर्मचार्यांना ३१ ऑगस्टला दिले. या विहिरीत आसपासचे नागरिक केरकचरा टाकत असल्याने पाणी दूषित झाले. विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकून साफसफाई करण्याचे निर्देश मेटकरी यांनी दिले.