बाधितांचा परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 05:02 AM2021-02-23T05:02:42+5:302021-02-23T05:02:42+5:30

--------- कामरगावात ४० जणांची कोरोना चाचणी कामरगाव: परिसरात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना ...

Seal the affected area | बाधितांचा परिसर सील

बाधितांचा परिसर सील

Next

---------

कामरगावात ४० जणांची कोरोना चाचणी

कामरगाव: परिसरात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. त्यात सोमवारी ४२ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

----------

मेहा येथे आरोग्य तपासणी

धनज बु.: नजीकच्या मेहा येथे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून रविवारपासून मेहासह परिसरातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली असून, यात १३ जणांची कोरोना चाचणीही करण्यात आली.

-------------

संत्रा पिकाच्या पाहणीची मागणी ध

नज बु.: परिसरात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे संत्रा फळे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी प्रशासनाकडून करण्याची मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी प्रशासनाकडे केली.

------------

धनज परिसरात आणखी ५ बाधित

धनज बु.: परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यात आरोग्य विभागाच्या सोमवारी प्राप्त अहवालानुसार, धनज येथील ४, रहाटी येथील १, तर अंबोडा येथील १ व्यक्ती मिळून ६ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले.

Web Title: Seal the affected area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.