कोरोना तपासणी न करणाऱ्या व्यावसायिकांची प्रतिष्ठाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:43 AM2021-03-27T04:43:16+5:302021-03-27T04:43:16+5:30

नऊ दुकाने बंद तर सामाजिक अंतर न राखल्याने एका दुकानावर दंडात्मक कारवाई कारंजा ---- दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग ...

Seal the reputation of professionals who do not inspect the corona | कोरोना तपासणी न करणाऱ्या व्यावसायिकांची प्रतिष्ठाने सील

कोरोना तपासणी न करणाऱ्या व्यावसायिकांची प्रतिष्ठाने सील

Next

नऊ दुकाने बंद तर सामाजिक अंतर न राखल्याने एका दुकानावर दंडात्मक कारवाई

कारंजा ---- दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्ण्मूगराजन एस. यांनी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांना २५ मार्चपर्यंत कोरोना तपासणी करून घेण्याचे तसेच तपासणी न केल्यास प्रतिष्ठाने बंद करण्यात येईल असा आदेश काढला आहे. त्यानुसार कांरजा न. प. चे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या नेतृत्वात पालिका कर्मचाऱ्यांनी शहरात कोरोना तपासणी न करणाऱ्या व्यावसायिकांसाठी पडताळणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान तपासणी न केल्याचे आढळून आल्याने ९ व्यावसायिकांची प्रतिष्ठाने सील करण्यात आली. तर सामाजिक अंतर न राखल्याने शहरातील सराफा लाईन परिसरातील महाराष्ट्र साडीसेंटरच्या संचालकावर दंडात्मक कारवाई करून ५ हजाराचा दंड वसुल करण्यात आला. तसेच शहरात विनामास्क फिरणाऱ्या १२ नागरीकांनकडून प्रत्येकी ५०० रूपये प्रमाणे ६ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला. न. प. च्या या कारवाईची व्यावसायिकांनी धास्ती घेतली असून तपासणी न करणाऱ्या दुकानदारंानी आपली दुकाने बंद ठेवल्याचे यावेळी निदर्शनास आले. यापुढेही शहरात या संदर्भात न. प. कडून कारवाइ्र सुरू राहणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी दिली आहे.

Web Title: Seal the reputation of professionals who do not inspect the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.