रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्यातील कामगारांचे लोंढे परप्रांताकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 02:47 PM2018-11-17T14:47:51+5:302018-11-17T14:47:58+5:30

रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. 

In the search of employment, the workers of the district of Washim district have a lot of professions | रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्यातील कामगारांचे लोंढे परप्रांताकडे

रोजगाराच्या शोधात वाशिम जिल्ह्यातील कामगारांचे लोंढे परप्रांताकडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस पडल्याचे दिसते; परंतु विविध नैसर्गिक संकटांमुळे पीक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला. रब्बीतही भारनियमनाचा खोडा असल्याने शेतीची कामे मिळेनासी झाली, तर रोजगाराचे इतरही पर्याय नसल्याने जिल्ह्यातील कामगार कुटुंबासह परप्रांताकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. 
जिल्ह्यात रोजगाराचा सर्वात मुख्य मार्ग हा शेतीवर आधारित आहे. उद्योग धंद्यांचा अभाव, विकासाची संथगती आदिंमुळे इतर कामांची उपलब्धताही नाही. त्यातच जिल्ह्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून असल्याने खरीप हंगामावरच शेतकरी आणि शेतमजुरांची भिस्त असते. जिल्ह्यात पावसाची अनियमितता नेहमीच पाहायला मिळते. त्यातच विविध नैसर्गिक संकटांचा परिणाम शेतीपिकांवर होतो. त्यामुळे उत्पादनात सातत्याने घट होत आहे. याचा परिणाम शेतीश्ी निगडित उद्योगधंद्यांवर होतो. त्यामुळेच खरीप हंगाम संपला की, जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर होतो. यंदाही ही स्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अनियमिततेचा फटका खरीप हंगामाला बसल्यानंतर रब्बी हंगामात भारनियमनाचा खोडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतीमधील कामे बंद पडली असून, शेतीवर अवलंबून असलेले कामगार रोजगारासाठी परप्रांतात धाव घेत आहेत. मानोरा तालुक्यातील अनेक गावे यामुळे निम्म्याहून अधिक रिकामी झाली असताना आता इतरही तालुक्यातील शेतमजूर कुटुंबासह परप्रांतात कामाच्या शोधात स्थलांतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

जोगलदरी परिसरातील शेकडो घरांना टाळे
मंगरुळपीर तालुक्यात खरीप हंगाम संपल्यानंतर कामे मिळेनासी झाली असून, शेतीवर अवलंबून असलेले शेकडो शेतमजुरांनी रोजगारासाठी पुणे, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि गुजरात, मध्यप्रदेशासारख्या राज्यात स्थलांतर केले आहे. एकट्या जोगलदरी येथील ५० घरांना टाळे ठोकून कामगार मुलाबाळांसह परप्रांतात गेले आहेत, तर साळंबी, कोळंबी, दाभा, कवठळ, कोठारी, चेहेल आदि ठिकाणचे अनेक मजुर परप्रांतात घराला टाळे ठोकून गेले आहेत. प्रामुख्याने उसतोडणीच्या कामाची निवड कामगारांनी केल्याचे या संदर्भातील माहितीवरून कळले आहे.

Web Title: In the search of employment, the workers of the district of Washim district have a lot of professions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम