सर्वेक्षणातून अनाथ बालकांना शोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:29 AM2021-05-31T04:29:35+5:302021-05-31T04:29:35+5:30

१८ वर्षाच्या आतील बालकांच्या पालकांचा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांचा शोध घेण्याची मोहीम जिल्ह्यात राबविली जात ...

Search for orphans from survey! | सर्वेक्षणातून अनाथ बालकांना शोध !

सर्वेक्षणातून अनाथ बालकांना शोध !

Next

१८ वर्षाच्या आतील बालकांच्या पालकांचा जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांचा शोध घेण्याची मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. जिल्हा परिषदेचा पंचायत विभाग आणि शहरी भागातील नगरपालिकांनी कोरोनामुळे पालक गमावल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी योग्य प्रकारे सर्वेक्षण करून त्या बालकांचा शोध घ्यावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. याशिवाय नागरिकांना चाईल्ड हेल्पलाइनच्या १०९८ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकावरही माहिती देता येणार आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून अनाथ बालकांची माहिती मिळाल्यास, ही माहिती पुढील कार्यवाहीसाठी माहिला व बालविकास विभागाकडे सुपुर्द करावी लागणार आहे. कोरोनाच्या संसगार्मुळे ज्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याने बालकांच्या व महिलेच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला असेल तर त्या महिलेला उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. कोरोनामुळे आई-वडिलांचा किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असेल अशा बालकांची नावे व यादी तयार करावी लागणार आहे. गावपातळीवर अनाथ बालकांचा शोध घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांचीदेखील मदत घेतली जात आहे. शहरी व ग्रामीण भागात सर्वेक्षणातून अनाथ बालकांचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Search for orphans from survey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.