पसरणीचे उपसरपंच विलास पोटपिटे हत्या प्रकरणी दुस-या आरोपीला अटक
By admin | Published: May 22, 2017 07:31 PM2017-05-22T19:31:25+5:302017-05-22T19:31:25+5:30
कारंजा लाड : पसरणी येथील उपसरपंच विलास पोटपिटे याची ५ एप्रिल रोजी हत्या झाली. याप्रकरणी कारंजा पोलीसांनी २२ मे च्या रात्री दुसरा आरोपी जुम्मा कासम गारवे याला अटक केली.
ऑनलाइन लोकमत
कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील ग्राम पसरणी येथील ग्राम पंचायतचे उपसरपंच विलास पोटपिटे याची दादगाव शेतशिवारात ५ एप्रिल रोजी हत्या झाली. हत्या प्रकरणी कारंजा पोलीसांनी पसरणी येथील महेबुब मदन चैधरी या इसमाला १७ मे रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान अटक केली तर दुसरा आरोपी जुम्मा कासम गारवे याला २२ मे च्या रात्री १ वाजतांच्या सुमारास अटक केली.
पसरणी येथील उपसरपंच विलास मारोती पोटपिटे विहिरचे बांधकाम करण्याचा व्यवसाय करीत होते.४ एप्रिल रोजी त्याच कामानिमित्त सांयकाळी ५ वाजता निघून गेले. दरम्यान पोटपिटे यांचा मृतदेह ५ एप्रिल रोजी दादगाव शेतशिवारात असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी तपास चक्र सुरू केले. दरम्यान महेबुब मदन चौधरी या आरोपीला १७ मे च्या रात्री १ वाजताच्या दरम्यान अटक केली. या आरोपीला २३ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या कडून तपास सुरू आहे. त्यानुसार पसरणी येथील दुसरा आरोपी जुम्मा कासम गारवे २२ मे च्या रात्री १ वाजताच्या दरम्यान अटक केली.