महाआवास राज्य योजनेत आखतवाडा ग्रामपंचायतला द्वितीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:15 AM2021-08-02T04:15:26+5:302021-08-02T04:15:26+5:30
महाआवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, तसेच उत्कृष्ट घरकूल बांधणाऱ्या लाभार्थींचा आमदार राजेंद्र पाटणी यांचे हस्ते कांजा पंचायत समितीत ...
महाआवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, तसेच उत्कृष्ट घरकूल बांधणाऱ्या लाभार्थींचा आमदार राजेंद्र पाटणी यांचे हस्ते कांजा पंचायत समितीत ३० जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यात उत्कृष्ट कामगिरीसाठी आखतवाडा ग्रामपंचायतला द्वितीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सरपंच योगिता चंद्रकांत गावंडे व सचिव गजाननराव उपाध्ये यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कारंजा पंचायत समितीच्या सभापती रवीना रोकडे, भाजप तालुकाध्यक्ष डॉ.राजिव काळे. जि.प. सदस्य अशोकराव डोंगरदिवे, गटविकास अधिकारी कालीदास तापी, शाखा अभियंता पवार, घरकूल योजना विभागाचे अधिकारी कर्मचारी, पं.स. सदस्य आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी तापी यांनी केले. आभारप्रदर्शन ग्रामसचिव गजाननराव उपाध्ये यांनी केले.
---------------
सरपंच, गावकऱ्यांचे कार्य उल्लेखनीय
महाआवास योजनेत आखवाडा ग्रामपंचायतने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यासाठी आखतवाडाचे ग्रामसचिव गजाननराव उपाध्ये, महिला सरपंच योगिता गावंडे, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य गण व गावकरी मंडळी प्रशंसेला पात्रा आहे, असे मत आमदार राजेंद्र पाटणी यांनी यावेळी व्यक्त केले.