दुसºया दिवशीही एस.टी. सेवा ठप्प; प्रवाशांची तारांबळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:16 PM2017-10-18T13:16:38+5:302017-10-18T13:18:14+5:30
वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाºयांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले. दुसºया दिवशीही अर्थात बुधवारीदेखील संप सुरू असल्याने प्र्रवाशांचे हाल होत आहेत.
सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एसटी मान्यताप्राप्त संघटनेने हा संप पुकारला आहे. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आयोग लागू करण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शविली. परिणामी, मान्यताप्राप्त संघटनेने संप करण्याचा निर्णय घेतला. शासनाने यासंदर्भात गांभीर्याने सकारात्मक भूमिका न घेतल्याने एसटी कामगारांचा संप सुरू झाला. मान्यताप्राप्त कामगार संघटना आणि इंटक या दोन्ही प्रमुख संघटना संपात सहभागी झाल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील ७०० हून अधिक कर्मचारी या संपात सहभागी झाले असून, या संपामुळे एसटीच्या प्रवासाला पसंती देणाºया प्रवाशांचे हाल होत आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व खासगी प्रवासी बस, स्कूल बस, कंपन्यांच्या मालकी बस आणि मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता दिली आहे तर दुसरीकडे खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनधारकांची चांदी होत आहे. खासगी वाहनांच्या प्रवासभाड्यात अचानक वाढ झाल्याने ऐन दिवाळी प्रवाशांना भुर्दंड बसत आहे.