महावितरणच्या पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा

By admin | Published: January 17, 2015 12:37 AM2015-01-17T00:37:07+5:302015-01-17T00:37:07+5:30

ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न; अंमलबजावणीवर निगरानी.

The second phase of the basic plan of MSEDCL | महावितरणच्या पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा

महावितरणच्या पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा

Next

वाशिम : महावितरणच्या वतीने गत दोन वर्षांमध्ये पायाभूत सुविधा आराखडा राबविण्यात आला. या उ पक्रमाचा पहिला टप्पा डिसेंबर २0१४ मध्ये संपला, तर जानेवारी २0१५ पासून दुसर्‍या टप्प्याला सुरूवा त झाली. ग्राहकांना चांगल्या दर्जाची, व्यवस्थित सेवा मिळावी, यासाठी जानेवारी २0१५ पासून पायाभूत आराखड्याचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. महावितरणने आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात वितरण यंत्रणेचे बळकटीकरण केले. यादरम्यान पुर्नरचित गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रम (आयआरडीपी) राबविण्यात आला. या योजनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे ग्राहकांना दिल्या जाणार्‍या सेवांची नोंद महाराष्ट्र शासनाने घेतली. याशिवाय वीज हानीवर आधारीत भारनियमनाचा फॉर्म्युला महावितरणने अंमलात आणला. वितरण हानी आटोक्यात आणली, गावठाण फिडर सेपरेशन योजना आणि सिंगल फेजिंग योजनेव्दारे भारनियमनाचे प्रभावी व्यवस्थापन केले. गत पाच वर्षात महाराष्ट्रात १0 लाखांपेक्षा जास्त कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या. पायाभूत आराखडा अंतर्गत राज्यात वीज वितरण हानी कमी करणे, ग्राहकांना ऑनलाईन सुविधा पुरविणे, यासाठी महावितरणने अत्याधुनिक तंत्रज्ञानाव्दारे विविध उ पाययोजना केल्या. पहिला टप्पा संपल्यानंतर जानेवारी २0१५ मध्ये दुसर्‍या टप्प्याला सुरूवात होणार आहे. यामध्ये स्थिरता आणि विश्‍वासार्हता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच इन्फ्रारेड मीटर, प्रीपेड मीटर जास्तीत जास्त प्रमाणात देण्यावर भर देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात राबविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही, यावरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Web Title: The second phase of the basic plan of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.