राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत वाशिम येथील सरस्वती शाळेचा द्वितीय क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:55 PM2018-02-10T13:55:04+5:302018-02-10T13:58:01+5:30
वाशिम - वाशिम येथे जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत स्थानिक सरस्वती प्राथमिक शाळेच्या चमूने द्वितीय क्रमांक पटकाविला.
वाशिम - वाशिम येथे जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत स्थानिक सरस्वती प्राथमिक शाळेच्या चमूने द्वितीय क्रमांक पटकाविला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशिय संस्था, राजरत्न अल्पसंख्याक शिक्षण प्रसारक व बहुउद्देशिय संस्था, सम्राट अशोक बहुउद्देशिय संस्था, स्वामी विवेकानंद सामाजिक बहुद्देशीय संस्था शिरपुर, युगगुरू बहुउद्देशिय संस्था रिठद व वाशिम नगर परिषद स्वच्छ सर्व्हेक्षण २०१८ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धा पार पडली. सकाळी ११ वाजता जिजाऊ सांस्कृतिक सभागृहात स्पर्धेला सुरूवात झाली. ग्रामीण व शहरी भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत सोलो, डयुट, गू्रप असे तीन प्रकार ठेवण्यात आले होते. तसेच वय १ ते १५, १६ ते ३५ तसेच ३६ वयोगटापासून सर्व स्पर्धकांसाठी ही स्पर्धा खुली होती.क्लासिकल, फोक, वेस्टर्न कलाप्रकारात गुणांकन करण्यात आले. या स्पर्धेत स्थानिक सरस्वती प्राथमिक शाळेच्या चमूने सहभाग नोंदवून १ ते १५ वर्षे वयोगटातून पारंपारिक बंजारा नृत्य सादर केले. या नृत्याला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. अश्विनी जाधव, सलोनी राठोड, समिक्षा राठोड, नंदिनी राठोड, वैदही चव्हाण व सुजल जाधव या विद्यार्थ्यांचा या चमूत सहभाग होता. द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव जाधव, सचिव नितीन जाधव, मुख्याध्यापक रमेश घुगे, नृत्याचे प्रशिक्षक प्रतापराव चंद्रशेखर, विनोद कुरकुटे, संध्या जाधव, किरण जाधव, मोनाली नंदेवार, पुजा पंडितकर, अविनाश चव्हाण, महादेव चव्हाण, सचिन जाधव, प्रवेश चंद्रशेखर, लोकचंद राठोड आदींनी शनिवारी सत्कार केला.