पत्रलेखन स्पर्धेत तायडे राज्यात द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:37 AM2021-04-03T04:37:50+5:302021-04-03T04:37:50+5:30
वाशिम : ऑनलाईन राज्य मराठी महोत्सव २०२१ अंतर्गत राबविण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेत येथील श्री बाकलीवाल विद्यालयात इयत्ता नववीत शिकणारा ...
वाशिम : ऑनलाईन राज्य मराठी महोत्सव २०२१ अंतर्गत राबविण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेत येथील श्री बाकलीवाल विद्यालयात इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी सुमित तायडे याने राज्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालयातर्फे त्याचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गाैरव करण्यात आला.
..................
रुग्णांच्या मोफत तपासणीचे आयोजन
वाशिम : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, रिसोडद्वारा संचालित फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यानुसार, ३ एप्रिल रोजी कारंजा तालुक्यातील दिघी, काकडशिवनी, ५ एप्रिल मुंगूटपूर, डोंगरगाव, ६ एप्रिल रोजी कारंजा तालुक्यातील पानगव्हाण येथे आयोजन करण्यात आले आहे.
................
जऊळका येथे प्रवाशांची गैरसोय
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून जऊळकामार्गे धावणारी पॅसेंजर रेल्वे बंद आहे. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होत असून रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.
..............
मेडशी येथे वाहन चालकांवर कारवाई
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर गुरुवारी पोलीस कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली. यावेळी संबंधितांकडून दंड वसूल करण्यात आला.
............
शिरपुरातील भाजीपाला उत्पादक अडचणीत
वाशिम : मालेगाव तालुक्यातील तुलनेने मोठी बाजारपेठ असलेल्या शिरपूर जैन येथे भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येत आहेत. कोरोनामुळे मात्र व्यवसाय होत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.
................
हातपंप दुरुस्त करण्याची मागणी
किन्हीराजा : गाव परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. पर्यायी व्यवस्था म्हणून हातपंपांचा ग्रामस्थांना आधार मिळतो. त्यामुळे नादुरुस्त असलेला हातपंप दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.