रस्ता कामासाठी गौण खनिज उत्खनन; पाणी साठवून ठेवण्याचे नियोजनच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:34+5:302021-05-06T04:43:34+5:30
समृद्धी महामार्गासाठी तऱ्हाळा येथील ई- क्लास जमिनीतून गौण खनिज वापरले, मात्र त्या ठिकाणी शासनाच्या धोरणानुसार सदर खड्ड्याला तलावाचे स्वरुप ...
समृद्धी महामार्गासाठी तऱ्हाळा येथील ई- क्लास जमिनीतून गौण खनिज वापरले, मात्र त्या ठिकाणी शासनाच्या धोरणानुसार सदर खड्ड्याला तलावाचे स्वरुप देणे आवश्यक होते, जेणेकरून त्या खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साठवून जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. मात्र संबंधित कंपनीने अशा कोणत्याच प्रकारचे नियोजन केलेले नाही. तऱ्हाळा येथील चार ते पाच स्थळांची पाहणी केली होती. त्यापैकी संबंधित कंपनीला अपेक्षित असलेल्या ठिकाणी त्यांनी खोदकाम करून गौण खनिज उचल केली. परंतु खोदकाम करताना कुठल्याही प्रकारचा जलसाठा निर्माण होईल असे खोदकाम केले नाही. त्या खड्ड्यात पाणीसाठा उपलब्ध राहत नाही. तलावाचे स्वरूप प्राप्त करून दिल्यास मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण होईल या उद्देशाने शासनाने समृद्धी महामार्गाकरिता लागणारे गौण खनिज देताना जलसाठे तयार होतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता आणि तो उद्देश मात्र या ठिकाणी पूर्ण झालेला दिसून येत नाही. याबाबत संबंधित कंपनीला आदेश द्यावे, अशी मागणी करण्यात आली. येत्या आठ दिवसांत कामाला सुरुवात केल्यास पावसाळ्याचे पाणी या तलावात साठवण्याची क्षमता निर्माण होईल व त्याचा फायदा गावातील जनावरांना व पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी होईल, अशी मागणी किशोर देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.