रिसोड येथे माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापकांचा उद्बोधन वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 01:19 PM2018-10-05T13:19:41+5:302018-10-05T13:20:05+5:30
रिसोड : अध्ययन व अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांच्या उद्बोधन वर्गास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ४ आॅक्टोबर गणित तर ५ आॅक्टोबरला भाषा विषयाचे धडे देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : अध्ययन व अध्यापनाचा दर्जा उंचावण्यासंदर्भात माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांच्या उद्बोधन वर्गास ३ आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला असून ४ आॅक्टोबर गणित तर ५ आॅक्टोबरला भाषा विषयाचे धडे देण्यात आले.
स्थानिक बाबासाहेब धाबेकर कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये गणित शिक्षक उद्बोधन वर्ग ४ आॅक्टोबर रोजी घेण्यात आला. याप्रसंगी उदबोधन वर्गास मार्गदर्शक म्हणून विश्वंभर अडाणे, प्रतिक्षा पापळकर, संतोष वाघमारे व गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी अध्ययन निश्चिती व अध्यापन कौशल्य विकसित करण्याचे पैलूबाबत मार्गदर्शन केले तसेच शाळास्तर विषय तसेच गणित स्तर यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर ५ आॅक्टोबरला भाषा विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
उद्बोधन वर्गास माध्यमिक शिक्षणाधिकारी तानाजी नरळे व गटशिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे यांनी भेट देवून पाहणी केली. या उद्बोधन वर्गास मालेगाव व रिसोड तालुक्यातील १५० शिक्षक उपस्थित होते. शिक्षकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले.