वाशिम मार्गे सिकंदराबाद-उदयपूर विशेष एक्स्प्रेस धावणार
By दिनेश पठाडे | Published: April 9, 2024 06:48 PM2024-04-09T18:48:39+5:302024-04-09T18:48:39+5:30
ही रेल्वे वाशिम मार्गे धावणार असल्यामुळे वाशिमकर प्रवाशांची तेलंगणा, राजस्थानात जाण्याची सोय होणार आहे.
वाशिम : आगामी सणवार आणि उन्हाळी सुट्यामध्ये होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासठी उत्तर पश्चिम रेल्वेने सिकंदराबाद-उदयपूर विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय ९ एप्रिलला घेतला. ही रेल्वे वाशिम मार्गे धावणार असल्यामुळे वाशिमकर प्रवाशांची तेलंगणा, राजस्थानात जाण्याची सोय होणार आहे.
उत्तर पश्चिम रेल्वेच्या माहिती नुसार गाडी संख्या ०७१२३ सिकंदराबाद-उदयपूर सिटी विशेष एक्स्प्रेस १६ ते २३ एप्रिल दरम्यान दर मंगळवारी प्रस्थान स्थानकावरुन रात्री २३:५० वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४९ वाजता वाशिम रेल्वेस्थानकावर पोहचून तिसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी १७:४५ वाजता उदयपूर सिटी स्थानकावर पोहचेल. या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या होतील. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७१२४ उदयपूर-सिकंदराबाद विशेष एक्स्प्रेस २० ते २७ एप्रिल दरम्यान दर शनिवारी उदयपूर येथून दुपारी १६:०५ वाजता सुटून वाशिम स्थानकावर तिसऱ्या दिवशी सोमवारी मध्यरात्री ००:४८ वाजता पोहचेल. त्याच दिवशी सकाळी ९:४५ वाजता सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर पोहचेल. या रेल्वेला बोलारम, मेडचल, कामारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, संत हिरदाराम नगर, शुजालपूर, उज्जैन, नागदा, शामगढ, कोटा, सवाईमाधोपुर, जयपूर, नसीराबाद, विजयनगर, भीलवाडा, मावली, राणाप्रतानगर येथे थांबा असणार आहे.