सुरक्षा सप्ताह नावापुरता; रस्ते असुरक्षितच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:36 AM2021-01-21T04:36:50+5:302021-01-21T04:36:50+5:30

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित ९१६ किलोमीटरचा प्रमुख जिल्हा मार्ग, ४२७ किलोमीटरचा राज्य मार्ग आणि ५ किलोमीटरचा प्रमुख राज्य ...

Security Week; Roads unsafe! | सुरक्षा सप्ताह नावापुरता; रस्ते असुरक्षितच!

सुरक्षा सप्ताह नावापुरता; रस्ते असुरक्षितच!

Next

जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित ९१६ किलोमीटरचा प्रमुख जिल्हा मार्ग, ४२७ किलोमीटरचा राज्य मार्ग आणि ५ किलोमीटरचा प्रमुख राज्य मार्ग असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे अंतर २४७ किलोमीटर व समृद्धी महामार्गाचे अंतर ९७ किलोमीटर एवढे आहे. जिल्ह्यातून गेलेल्या सर्वच ठिकाणच्या राष्ट्रीय महामार्गांची कामे पूर्ण झाली असून हे रस्ते वाहतुकीसाठी खुले झालेले आहेत; तर समृद्धी महामार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. दरम्यान, सिमेंट-काँक्रीटच्या राष्ट्रीय महामार्गांवर अपघातांची संख्या वाढली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गत प्रभावी जनजागृती करून अपघातांवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे ठरत आहे; मात्र असे होताना दिसत नाही.

..................

बॉक्स :

वाशिम-कारंजा रस्त्यावर १५ दिवसांत ५ अपघात

वाशिम ते कारंजा या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गामध्ये समावेश करण्यात आला आहे. या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांत या मार्गावरील कळंबा महाली गावानजीक २, साखरा फाट्यानजिक २ आणि पॉवर हाऊसनजीक १ असे ५ अपघात घडले. त्यात काहीजण गंभीर असून अकोला येथे उपचार सुरू आहेत.

.........................

कळंबानजीक ट्रक उलटला

रस्ता सुरक्षा सप्ताहाला १८ जानेवारीपासून सुरुवात झाली. त्याच्या दोनच दिवसांत, २० जानेवारीला पहाटे मंगरूळपीरकडून वाशिमकडे येणारा ट्रक (एम.एच.२० ई.जी. ०८६४) उलटून अपघात झाल्याचा प्रकार निदर्शनास आला. यावरून अपघातांवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे बोलले जात आहे.

..........................

बॉक्स :

जिल्हांतर्गत विविध मार्गांचे अंतर

प्रमुख जिल्हा मार्ग - ९१६ किलोमीटर

राज्य मार्ग - ४२७ किलोमीटर

प्रमुख राज्य मार्ग - ५ किलोमीटर

राष्ट्रीय महामार्ग - २४७ किलोमीटर

समृद्धी महामार्ग - ९७ किलोमीटर

..................

बॉक्स :

रस्ता सुरक्षेसाठी विभागनिहाय जबाबदारी

परिवहन विभाग, पोलिस (वाहतूक) विभाग - रस्ते सुरक्षित राहण्यासंदर्भात चौकसभा घेणे, जनजागृतीपर बॅनर लावणे, वाहनचालकांसाठी वाहतूक प्रबोधनपर कार्यशाळा आयोजित करणे, अपघातातील जखमींचा जीव वाचविणे व त्यांच्यावर तातडीने उपचार करणे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ - प्रबोधन शिबिर, एस.टी.मधून रस्ते सुरक्षिततेसंदर्भात कायमस्वरूपी फिरते प्रदर्शन आयोजित करणे.

सार्वजनिक बांधकाम विभाग - प्रवासी मार्गदर्शक फलक लावणे, रस्ता दुरुस्तीच्या ठिकाणी सावधानतेचा इशारा व उपाययोजना, खड्डे दुरुस्ती, साईनबोर्ड व माहिती फलक असे अनेक उपक्रम राबविण्यात येणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य रस्ते विकास महामंडळ - रस्त्यांवर ब्लॅक स्पॉटचे फलक लावणे, झेब्रा क्रॉसिंगचे नियोजन करणे.

नगरपालिका - शहरांतर्गत रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करणे, पादचाऱ्यांकरिता झेब्रा क्रॉसिंग आखणे, जनजागृती व चर्चासत्राचे आयोजन करणे.

आरोग्य विभाग - वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करणे, अपघातातील जखमींचा जीव वाचवून तातडीने उपचार करणे, त्यासाठी ‘इमर्जन्सी टीम’चे गठण करून ती सज्ज ठेवणे.

..................

कोट :

वाशिमच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तुलनेने मनुष्यबळ अत्यल्प आहे. सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची १४ पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ ५ भरण्यात आली आहेत. यामुळे रस्ता सुरक्षेकडे लक्ष देणे अशक्य ठरत आहे. असे असले तरी महिनाभराचा कार्यक्रम आखला असून रस्ते सुरक्षा सप्ताहाची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.

- ज्ञानेश्वर हिरडे

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम

Web Title: Security Week; Roads unsafe!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.