बियाणे भेसळीच्या प्रकरणांत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:21 AM2017-09-09T01:21:25+5:302017-09-09T01:21:40+5:30
महाबीजच्या मंगरुळपीर तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या लॉटमधील बियाणे पेरणार्या शेतकर्याच्या शेतात कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली असता. दोन शेतकर्यांच्या शेतात भेसळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकर्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर: महाबीजच्या मंगरुळपीर तालुक्यात महाबीजच्या बियाण्यांतील भेसळीच्या प्रकरणांचा आकडा अधिक वाढला आहे. विशेष म्हणजे महाबीजच्या ज्या लॉटमधील बियाण्यांत भेसळ झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या लॉटमधील बियाणे पेरणार्या शेतकर्याच्या शेतात कृषी विभाग आणि महाबीजच्या प्रतिनिधीने भेट दिली असता. दोन शेतकर्यांच्या शेतात भेसळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संदर्भातील शेतकर्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील शेतकरी गोविंदा भगत यांनी यंदाच्या खरीप हंगामात खरेदी विक्री समितीमधून पेरणीसाठी महाबीजचे ९३0५ वाणाचे तीन बॅग सोयाबीन विकत घेतले होते. सदर बियाणे उगविल्यानंतर त्यामध्ये दुसर्या वाणाची झाडे मोठय़ा प्रमाणात उगविल्याचे त्यांना दिसले. या संदर्भा त त्यांनी मंगरुळपीर पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांकडे तक्रार
केल्यानंतर काही दिवसांनी महाबीजचे सहाय्यक्ष क्षेत्र अधिकारी, कृषी शास्त्रज्ञ, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी, तसेच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांनी त्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी केली असता. गोविंदा भगत यांच्या शेतात ९३0५ हे वाण ३0 टक्के, तर इतर मिश्र वाण ७0 टक्के असल्याचे दिसले. हाच प्रकार वाडा फार्म शिवारातील चार शेतकर्यांसोबत घडला. त्यांच्या शेतात भेसळीचे प्रमाण कमी असल्याचे कृषी विभागाच्या पाहणी करणार्या अधिकार्यांना दिसले. त्यावरून गोविंदा भगत यांच्यासह पाचही शेतकर्यांबाबत घडलेल्या प्रकाराचा एक संयुक्त अहवाल पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांनी तयार करून वरिष्ठ अधिकार्यांकडे पाठविला.
उपरोक्त शेतकरी गोविंदा भगत यांनी खरेदी विक्री समितीकडून ज्या लॉटमधील बियाणे खरेदी केले, त्याच लॉटमधील बियाणेमंगरुळपीर तालुक्यात सायखेडा येथील शेतकर्यांनीही खरेदी केले होते. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकार्यांनी सायखेडा ये थील संबंधित शेतकरी पुरुषोत्तम काळे आणि गजानन भगत यांच्या शेतांची पाहणी करण्याचे ठरविले. कृषी विभागाने सायखेडा येथील ज्या शेतकर्यांच्या शे तामधील सोयाबीनची पाहणी केली. त्यामधील पुरुषोत्तम काळे यांच्या शेतात २८ टक्के, तर गजानन काळे यांच्या शेतात १५ टक्के भेसळ असल्याचेही स् पष्ट झाले.
तक्रारकर्त्याला केले पंचनाम्यात सहभागी
बियाण्यांत भेसळ असल्याची तक्रार करणार्या शे तकर्यालाच दुसर्या शेतकर्याच्या याच संदर्भातील पंचनामा करताना सहभागी करून त्याची स्वाक्षरी घेण्याची कामगिरी कृषी विभागाने केली आहे. यासाठी कृषी अधिकार्यांनी बियाणे भेसळीची तक्रार करणारे शेतकरी गोविंदा भगत यांच्या मुलास सोबत नेले आणि पंचनामा करताना त्याच्या स्वाक्षर्याही घे तल्या. याबाबत शंका घेतल्यानंतर पंचायत समितीच्या कृषी अधिकार्यांनी पंचनाम्यावरील त्या स्वाक्षर्या खोडून काढल्या; परंतु एका तक्रारकर्त्या शेतकर्याच्या शेतातील पाहणीदरम्यान पंचनामा करताना दुसर्या तक्रारकर्त्याच्या स्वाक्षर्या घेणे किंवा त्यांना पंचनाम्या त सहभागी करणे, हा प्रकारच अनाकलनीय आहे.
सायखेडा येथील शेतकर्यांच्या शेताची पाहणी करण्यासाठी आम्ही सहजच चांभई येथील तक्रारक र्त्या शेतकर्याच्या मुलास सोबत नेले. त्यांच्याकडून स्वाक्षरी घेण्यात आली; परंतु त्यांनी शंका उपस्थित केल्यानंतर त्यांची स्वाक्षरी खोडली आहे. यामध्ये शे तकर्याचे नुकसान करण्याचा कोणताच उद्देश नाही.
-पी. एस. शेळके
कृषी अधिकारी, पंचायत समिती मंगरुळपीर