बीज प्रकिया ऑनलाईन स्पर्धेचा निकाल जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:29+5:302021-08-19T04:45:29+5:30
सोशल मीडियाचा वापर करून १४ मे २०२१ ते १५ जुलै २०२१ पर्यंत स्पर्धा राबविण्यात आली. त्यात ६२०० शेतकऱ्यांनी ऑनलाईन ...
सोशल मीडियाचा वापर करून १४ मे २०२१ ते १५ जुलै २०२१ पर्यंत स्पर्धा राबविण्यात आली. त्यात ६२०० शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली होती. त्यांपैकी २३९० शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करीत असतानाचे व्हिडिओ बनवून सक्रिय सहभाग नोंदविला. बीज प्रक्रिया ही लोकचळवळ व्हावी, रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा, या उद्देशातून घेण्यात आलेली ही स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व वयोगटांतील शेतकऱ्यासाठी खुली आणि नि:शुल्क होती. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनी, १५ ऑगस्ट रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
राज्यस्तरावर प्रथम पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली; तसेच सहभागी मुलांमधून पाच मुलांची निवड करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम तीन स्पर्धकांची निवडदेखील करण्यात आली. मालेगाव तालुक्यातून सर्वसाधारण गटात केशव भगत (चांभई), रवी चुंबळे (जाम), युवराज आव्हाळे (जाम) यांनी यश पटकाविले. स्पर्धेसाठी मधुकर पाचारणे, राजेंद्र कदम आणि त्यांच्या चमूचे मोलाचे सहकार्य मिळाले. वाशिम जिल्ह्यासाठी समन्वयक म्हणून कृषी सहायक अमोल हिसेकर यांनी कामगिरी बजावली.