जिल्ह्यात १.९५ लाख क्विंटल बियाणांवर बीजप्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:15+5:302021-06-21T04:26:15+5:30

कृषी उत्पादनवाढीत बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीतून व बियाणांद्वारे पसरणारे रोग व किडींचा पिकांवरील प्रादुर्भाव कमी करून ...

Seed processing on 1.95 lakh quintals of seeds in the district | जिल्ह्यात १.९५ लाख क्विंटल बियाणांवर बीजप्रक्रिया

जिल्ह्यात १.९५ लाख क्विंटल बियाणांवर बीजप्रक्रिया

Next

कृषी उत्पादनवाढीत बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीतून व बियाणांद्वारे पसरणारे रोग व किडींचा पिकांवरील प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी बीजप्रक्रिया हे कमी खर्चाचे अत्यंत प्रभावी साधन आहे. यासाठीच कृषी विभागाकडून खरीप व रब्बी हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर बीजप्रक्रिया केलेल्या बियाणांची पेरणी करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. यंदा वाशिम जिल्ह्यात या मोहिमेला मोठा प्रतिसाद लाभला असून, कृषी विभागाच्या मार्गदर्शनात २० जूनपर्यंतच एक लाख ९५ क्विंटल बियाणांवर शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केली आहे.

------------------

बीजप्रक्रियेचे फायदे

१) पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते.

२) बियाणे व रोगांद्वारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येते.

३) बियाणांभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते व रोपांना शेतात प्रस्थापित होण्यास मदत होते.

४) रोग नियंत्रण खर्चात बचत होते.

५) बियाणांची उगवणशक्ती वाढून उत्पादनात वाढ होते.

६) साठवणगृहात साठवणुकीदरम्यान बियाणांचे संरक्षण होते.

७) पीक एकसारखे वाढते व मशागतीचा खर्च कमी येतो.

८) बियाणांचा दर्जा वाढून बाजारभाव चांगला मिळतो.

----

बीजप्रक्रियेसाठी गतवर्षी औषधांचा वापर

१) औषधी पावडर २२२७ किलो

२) तरल औषधी ३६६० लिटर

-----

यंदाच्या हंगामासाठी औषधीची उपलब्धता

१) औषधी पावडर २३,७१० किलो

२) तरल औषधी १२,६७१ लिटर

------

बीजप्रक्रियेतील बियाणांचे प्रमाण

१) सोयाबीन- एक लाख ४४ हजार क्विंटल

२) तूर- ३५ हजार क्विंटल

३) मूग - सात हजार क्विंटल

४) उडिद नऊ हजार हजार क्विंटल

---------

बॉक्स : कोणत्या बियाणांसाठी कशाची बीजप्रक्रिया

कपाशी : पेरणीपूर्वी थायोमेथोक्झाम ७० डब्लूएस ४.२८ ग्रॅम प्रतिकिलो, इमिडॅक्लोप्रिड लिक्विड ७०.डब्लूएस. ७.५ गॅरम प्रतिकिलो, सुडोमोनोफॉस फल्युरोसन्स (पीएफ-१) १० ग्रॅम प्रतिकिलो, तर एझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम प्रति १० किलो.

-------------

मूग/उडिद : ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो बियाणास तसेच रायझोबियम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४० ग्रॅम प्रति १० किलो.

-------

तूर : बुरशीजन्य मुळकुज रोग, मररोगाच्या नियंत्रणासाइी ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रतिकिलो, २५० ग्रॅम रायझोबियम प्रति १० किलो, पेरणीपूर्वी बियाणे साठविताना अ‍ॅझॅडिरेक्टिन ३०० पीपीएम (५ मिली प्रतिकिलो), रायझोबियम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू २५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४० ग्रॅम प्रति १० किलो.

---------------

सोयाबीन : रायझोबिअम २५० ग्रॅम आणि स्फुरद विरघळविणारे जीवाणू २५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४० ग्रॅम प्रति १० किलो.

-------

कोट : पिकांचे रोगनियंत्रण आणि बियाणांची उगवणशक्ती वाढविण्यासाठी बीजप्रक्रिया मोहीम राबविली जाते. यंदा या मोहिमेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, २० जूनपर्यंत एक लाख ९५ हजार क्विंटल बियाणांवर बीजप्रक्रिया करण्यात आली आहे. जिल्ह्यात यंदा ८० टक्क्यांहून अधिक बियाणांवर बीजप्रक्रिया होण्याचा विश्वास आहे.

-एस.एम. तोटावार,

जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

------------------

Web Title: Seed processing on 1.95 lakh quintals of seeds in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.