शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले बियाणे, खते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:39 AM2021-05-15T04:39:30+5:302021-05-15T04:39:30+5:30
गुगल लिंकद्वारे प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र फॉर्म तयार करण्यात आला असून त्यामध्ये संबंधित नजीकचे कृषि सेवा केंद्र निवडण्याची सुविधा शेतकरी, ...
गुगल लिंकद्वारे प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र फॉर्म तयार करण्यात आला असून त्यामध्ये संबंधित नजीकचे कृषि सेवा केंद्र निवडण्याची सुविधा शेतकरी, शेतकरी गटांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने बियाणे, खते, बीजप्रक्रिया साहित्य कोणत्याही गटाला खरेदी करता येणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्याच्या लिंकद्वारे फॉर्म भरून द्यायचा आहे. प्रत्येक तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकाऱ्याकडे माहिती संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुका कृषि अधिकारी, तंत्र अधिकारी, मंडळ अधिकारी हे त्यावर लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांची मागणी प्राप्त होताच संबंधित कृषि सहाय्यक यांना कळविण्यात येईल व सदर कृषि सहाय्यक शेतकऱ्यांशी संपर्क करतील. शेतकऱ्यांनी नमूद केलेल्या कृषि सेवा केंद्रातून निविष्ठा थेट बांधावर पोहोचविण्यासाठी कृषि सहाय्यक मदत करतील. गतवर्षी याच पद्धतीने जिल्ह्यात बांधावर खते, बियाणे उपलब्ध करून देण्यात आली होती.