पाेलीस विभागाकडून साडेतीन काेटी रुपयांचे नशिले पदार्थ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:28+5:302021-07-01T04:27:28+5:30

वाशिम : जिल्हा पाेलीस विभागातर्फेे गत दाेन वर्षांमध्ये माेठ्या प्रमाणात नशिले पदार्थ अवैधपणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून साडेतीन ...

Seizure of drugs worth Rs | पाेलीस विभागाकडून साडेतीन काेटी रुपयांचे नशिले पदार्थ जप्त

पाेलीस विभागाकडून साडेतीन काेटी रुपयांचे नशिले पदार्थ जप्त

Next

वाशिम : जिल्हा पाेलीस विभागातर्फेे गत दाेन वर्षांमध्ये माेठ्या प्रमाणात नशिले पदार्थ अवैधपणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून साडेतीन काेटी रुपयांचे नशिले पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये अफू पावडरसह गांजा, गुटखा, दारूचा समावेश आहे.

पाेलीस अधीक्षक वसंत परदेसी यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर विविध सामाजिक उपक्रमासह गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केलेत. यामध्ये विविध नावीण्य उपक्रमांचा समावेश आहे. गणेश विसर्जनामध्ये वाहनावर शस्त्र प्रदर्शनाची जिल्ह्यात प्रथा हाेती ती बंद केली तर काेराेना काळात संचारबंदी दरम्यान १० हजारपेक्षा जास्त गरीब लाेकांना किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे माेफत वाटप करण्यात आले. साेबतच अवैध धंद्यावरील कारवाईमध्ये नशिले पदार्थ माेठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. यामध्ये १ काेटी ८५ लाख ९६ हजार १३० रुपयांची अफू पावडर, ४३ लाख २६ हजार २५० रुपयांचा गांजा, १ काेटी १८ लाख रुपयांचा गुटखा तर ६ लाख ६५ हजार रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. तसेच अपघाती मृत्यूचे प्रमाण १८ टक्क्याने कमी करून वाशिम जिल्हा महाराष्ट्रात अपघाती मृत्यू कमी करण्यामध्ये महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर आणला.

............

जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था अबाधित रहावा यासाठी पाेलीस विभागाकडून प्रयत्न केल्या गेला आहे. वेळाेवेळी नियम कडक करून गुन्हेगारीस आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येताे. यामध्ये नागरिकांचेही माेलाचे सहकार्य लाभते. पाेलीस विभागातील प्रत्येक कर्मचारी आपले कर्तव्य चाेखपणे बजावत असल्यानेच जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण माेठ्या प्रमाणात कमी झाले आहे. पाेलीस नागरिकांचा मित्र आहे, त्यांना सहकार्य करून गुन्हेगारी नष्ट करू या.

- वसंत परदेशी

पाेलीस अधीक्षक, वाशिम

Web Title: Seizure of drugs worth Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.