खासगी गोदामातील ४७९ क्विंटल संशयास्पद तांदुळ जप्त, वाशिम येथील घटना

By संतोष वानखडे | Published: September 21, 2023 04:35 PM2023-09-21T16:35:45+5:302023-09-21T16:36:31+5:30

शासकीय धान्य गोदाम, वाशीम येथे हा तांदूळ जमा करण्यात आला.

Seizure of 479 quintals of suspicious rice from a private godown, incident at Washim | खासगी गोदामातील ४७९ क्विंटल संशयास्पद तांदुळ जप्त, वाशिम येथील घटना

खासगी गोदामातील ४७९ क्विंटल संशयास्पद तांदुळ जप्त, वाशिम येथील घटना

googlenewsNext

वाशिम : बिलालनगर, वाशीम येथील मोहम्मद फहीम मोहम्मद अकबर यांचे खाजगी गोदामामधील संशयास्पद अवैधरित्या साठवणूक केलेला ४७९ क्विंटल तांदूळ पुरवठा विभागाने जप्त केला. शासकीय धान्य गोदाम, वाशीम येथे हा तांदूळ जमा करण्यात आला. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वझीरे यांच्या चमुने बिलालनगर, वाशीम येथील मोहम्मद फहीम मोहम्मद अकबर रा. वाशीम यांचे खाजगी गोदामावर छापा मारला.

यावेळी ९२१ प्लास्टीक पोत्यांचे कट्टे ( वजन ४७१.२१ क्विंटल) आढळुन आले. तसेच गोदामाबाहेरील एमएच ३७ टी १८१२ क्रमांकाचे  वाहन सुध्दा जप्त करण्यात आले असून यामध्ये तांदुळ १९ कट्टे (वजन १२. ११ क्विंटल), गहु २ कट्टे (वजन ०.७८ क्विटल), चणा १ कट्टा (वजन ०.३७ क्विंटल) आढळुन आले. सर्व धान्य शासकीय धान्य गोदाम, वाशीम येथे जमा करण्यात आले असून वाहन व इलेक्ट्रानिक वजन काटा, वाहन चालकाचा मोबाईल पोलीस स्टेशन, वाशीम शहर येथे जप्त ठेवण्यात आला. या प्रकरणातील जप्त केलेल्या सर्व धान्याचे बाजारमुल्य अंदाजे रुपये १० लाख ६६ हजार ३४४ रुपये आहे. जप्त वाहन, मोबाईलची किंमत अंदाजे २ लाख १२ हजार रुपये आहे.

या प्रकरणातील तांदुळ धान्य संशयास्पद असल्याने धान्यमालक मोहम्मद फहीम मोहम्मद अकबर, रा. वाशीम यांचेविरुध्द वाशिम तहसिलदार कैलास देवळे यांचे मार्फत  पोलीस स्टेशन, वाशीम शहर येथे जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९५५ मधील कलम ३ व ७ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. या कार्यवाहीमध्ये पुरवठा विभागाचे कर्मचारी निरीक्षण अधिकारी रुपल खांदवे, गोदाम व्यवस्थापक बळीराम मुंढे, पुरवठा अव्वल कारकुन सचिन भारसाकळे, गजानन सोनार, तलाठी चिपडे यांचा सहभाग होता.

Web Title: Seizure of 479 quintals of suspicious rice from a private godown, incident at Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम